नाशिकमध्ये लागली घराला आग ,जळाली सारी लग्नाची शिदोरी

आगीत घरातील फर्निचर, नवीन कपडे, २० हजारांची रोकड व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे.A fire broke out in a house in Nashik, the whole wedding was burnt


विशेष प्रतिनिधी

नाशिक : रविवार (ता. १६) सकाळी नऊच्या सुमारास नाशिकमधील शिवाजी चौकातील एका घरास आग लागून हजारोंचे नुकसान झाले. आगीत घरातील फर्निचर, नवीन कपडे, २० हजारांची रोकड व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे.दरम्यान घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद झाली आहे.शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला.आगीत नवीन कपडे, फर्निचर, एलईडी टीव्ही, इलेक्ट्रिक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे, २० हजारांची रोकड, असा सुमारे ४० ते ५० हजारांचा ऐवज खाक झाला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.नेमकी घटना काय घडली ?

शिवाजी चौकातील घरात मजुरी करणारे संजीवकुमार चव्हाण व पाच ते सहा जण भाडेतत्त्वावर राहतात.दरम्यानरविवार सकाळी सर्वजण कामावर गेले.दरम्यान घरास आग लागून आतून धूर येत होता.तसेच घरातील पाच किलोचे सिलिंडर आणि एलईडी टीव्हीचा स्फोट झाला.त्यामुळे संपूर्ण घर आगीच्या कचाट्यात आले.परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलास माहिती दिली.

अग्निशमन मुख्यालय, तसेच पंचवटीचा बंब घटनास्थळी दाखल झाले. अडचणीची जागा असल्याने आग विझविण्यास अडचण येत होती. घरास बाहेरून कुलूप असल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कुलूप तोडून, तसेच घराच्या वरील भागातून पत्रे काढून आजूबाजूच्या घरातून आगीवर पाण्याचा मारा केला.अतिशय शर्तीच्या प्रयत्नानंतर तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले.

A fire broke out in a house in Nashik, the whole wedding was burnt

महत्त्वाच्या बातम्या