“Sigma” Jaishankar : भारताची ओळख “हिंदू”च, पण बहुसांस्कृतिक!!; तुमचा “चष्मा” बदला, परदेशी पत्रकारांना सुनावले!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताची संस्कृतिक ओळखच मुळात “हिंदू” आहे, पण ती ऐकारलेली नाही, तर बहुसांस्कृतिक आहे…!!, त्यामुळे भारताकडे पाहण्याचा “विशिष्ट चष्मा” बदला, अशा शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काही परदेशी पत्रकारांच्या हिंदुराष्ट्र विषयक प्रश्नांना परखड उत्तर दिले. भारताची वाटचाल धर्मनिरपेक्षतेचे कडून हिंदु राष्ट्राच्या दिशेने होत आहे का?? भारतात जगातली तिसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची ओळख सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष देशाचे पंतप्रधान या ऐवजी हिंदुराष्ट्राचे पंतप्रधानांशी होत आहे का??, असे सवाल काही पत्रकारांनी केले. त्यावर जयशंकर यांनी संयमी शब्दात पण परखड उत्तर देत भारताची सांस्कृतिक ओळख “हिंदू” असल्याचे ठामपणे स्पष्ट केले. “Sigma” Jaishankar: India’s identity is “Hindu”, but multicultural !!; Change your “glasses”, told foreign journalists !!

– पारंपरिकतेच्या पलिकडे पाहा

जयशंकर म्हणाले, की पत्रकारांच्या विश्लेषणाची मी सहमत नाही. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना भारतात कोणत्याही बाहेरच्या प्रेरणेतून आलेले नाही. हिंदू समाजाची ही अंतःप्रेरणा आहे. हिंदू समाज मुळातच बहुसांस्कृतिक आहे आणि तीच भारताची खरी ओळख आहे. उलट भारतात आता जे आधुनिक बदल होत आहेत त्याकडे सध्याच्या पत्रकारांचे लक्ष नाही. ते अजूनही भारताच्या पारंपारिक ओळखीमध्ये अथवा पहचान मध्येच अडकले आहेत.

https://www.facebook.com/watch/?extid=WA-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&v=684098196137496

– तरुण भारत बदलतोय

तरुण भारत बाहेरून आणि आतून दोन्हीकडून बदलत आहे. भारताची तरुण लोकसंख्या नवनव्या संकल्पना स्वीकारत आहे. यात सरकारचा हस्तक्षेप कमी आहे पण सामाजिक घुसळण आणि सामाजिक बदल अधिक मोठे आहेत. शहरीकरण महानगरांकडून छोट्या शहरांकडे वळले आहे. अर्थातच सत्तेचे लाभ घेणार्‍यांचे प्रमाण छोट्या शहरांमध्ये वाढले आहे. आशा – आकांक्षांचे – स्वप्नांचे एक प्रकारे हे वितरण आहे. याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.– 370 नंतरचे सकारात्मक बदल

काश्मीर प्रश्नासंदर्भात बोलतांना जयशंकर म्हणाले की, काश्मीर प्रश्नाकडे मुळातच हिंदु-मुस्लिम अशा चष्म्यातून पाहणे सोडून दिले पाहिजे. काश्मीर मध्ये 370 कलम पाठवल्यानंतर तिथले सकारात्मक बदल झाले. काश्मीर कडे एक आर्थिक प्रदेश म्हणून पाहण्याची दृष्टी नव्याने विकसित होत आहे. मुस्लिमांची भारतातील प्रभावी संघटना “जमियत उलेमा जय हिंद” देखील काश्मीरमधील या सकारात्मक बदलांचे स्वागत केले आहे, याकडे जयशंकर यांनी आवर्जून लक्ष वेधले.

– आखाती देशांची उत्तम संबंध

गेल्या 5 – 7 वर्षांमध्ये भारताचे संबंध आखाती देशांची मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अधिक मजबूत झाले आहेत. आखाती देशांमध्ये देशांचा धर्म कोणता हे मी सांगण्याची गरज नाही. ते मुस्लिम देश आहेत. पण तरी देखील त्यांचे भारतात “व्हेस्टेड इंटरेस्ट” नाहीत. भारतातल्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याची त्यांची इच्छा नाही. भारताचे लोकशाहीकरण त्यांनी जवळून पाहिले आहे. गेल्या 70 वर्षांच्या विविध राजवटींच्या राजकीय पक्षांनी एकूण कर्तृत्वाचा हा परिपाक आहे. तो एकांगी नाही, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.

परदेशी पत्रकारांनी उपस्थित केलेला हिंदू-मुस्लीम परंपरागत संघर्षाचा मुद्दा त्यांनी ठामपणे खोडून काढला. भारताचे नव्याने आकलन करा करण भारत नवा आधुनिक होताना कोणते बदल स्वीकारून तो पुढे चालला आहे, याकडे नीट लक्ष पुरवा, असे त्यांनी संबंधित पत्रकारांना सुनावले.

“Sigma” Jaishankar : India’s identity is “Hindu”, but multicultural !!; Change your “glasses”, told foreign journalists !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात