बुलडोझरमामाची कारवाई, लव्ह जिहादमधील आरोपीचे घर पाडले, राजू नाव धारण करून इम्रानने फसवले होते हिंदू मुलीला


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : लव्ह जिहाद करत मुलीला हिंदू नाव धारण करून फसविणाऱ्या एकाचे घर मध्य प्रदेशात पाडण्यात आले. बुलडोझर मामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवराज सिंह चौहान सरकारने प्रथमच अशा प्रकारची कारवाई केली आहे. इम्रान नावाच्या एका तरुणाने राजू असे नाव सांगून हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी लग्न केले. नंतर तिने मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर मौलवी आणि दिराने तिच्यावर बलात्कार केला.House of accused in Love Jihad demolished, Imran had cheated Hindu girl by using Raju name

पीडितेच्या नातेवाईकांनी ग्वाल्हेर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, आरोपी बेकायदेशीरपणे बांधलेल्या घरात राहत असल्याचे उघड झाले. तहसीलदार दीपक शुक्ला, एसडीओपी विवेक शर्मा, स्टेशन प्रभारी यांच्यासह पालिकेचे कर्मचारी इमरानच्या जंगीपुरा, डाबरा येथील घर पाडण्याचे आदेश घेऊन पोहोचले.परिसरात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. इम्रानचे घर एका अरुंद गल्लीत असल्याने बुलडोझर त्याच्या घरापर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी, पालिका अधिकाऱ्यांनी आधी घर रिकामे केले, नंतर मजुरांच्या मदतीने ते पाडले. माफियाविरोधी कारवाईचा भाग म्हणून इम्रानचे बेकायदेशीर घर पाडण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील गोल पहारिया येथे राहणाºया एका मुलीने डाबरा येथील रहिवासी असलेल्या इम्रानवर हिंदू असल्याचे भासवून तिला मैत्री आणि लग्नासाठी प्रलोभन दिल्याचा आरोप केला होता. तरुणीने पोलिसांना सांगितले की ती आरोपीला जानेवारी 2021 मध्ये एका कार्यक्रमात भेटली होती. त्याने स्वत:ची ओळख राजू जाटव अशी दिली.

त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. लग्न झाल्यानंतर तिला तिच्या पतीचा खरा धर्म आणि खरे नाव इम्रान हे कळले. जेव्हा ती इम्रानसोबत राहू लागली, तेव्हा एक मौलाना आला आणि त्याने सांगितले की विवाह अवैध आहे आणि त्यांना मुस्लिम विधींनुसार लग्न करणे आवश्यक आहे. ज्यासाठी तिला इस्लाम स्वीकारणे आवश्यक आहे. तिने धर्म बदलण्यास नकार दिला तेव्हा लग्नाच्या रात्रीच दिराने आणि मौलानाने तिच्यावर बलात्कार केला.

लग्नानंतर सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली आणि 7 महिने ओलीस ठेवल्याचा आरोप केलो. तिने सांगितले की तिची सासू सुगा बेगमने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तिला एका खोलीत कोंडून ठेवले आणि अनेक तरुण आत येऊन तिच्यावर बलात्कार करत. एके खोलीचा दरवाजा चुकून उघडा राहिला होता. संधीचा फायदा घेत ती आई-वडिलांच्या घरी पळून गेली.

House of accused in Love Jihad demolished, Imran had cheated Hindu girl by using Raju name

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”