20 वर्षे मोदींचा अपमान केला, आता उपराष्ट्रपतींचा अपमान करताय; राहुल गांधी म्हणाले, अब कमेंट नही करूँगा!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 20 वर्षे मोदींचा अपमान केला, आता उपराष्ट्रपतींचा अपमान करताय, या माध्यम प्रतिनिधींच्या सवालावर राहुल गांधी संसद संकुलात बचावात्मक पवित्र्यात आले आणि “अब कमेंट नही करूँगा”, असे म्हणून निघून गेले.Insulted Modi for 20 years, now insulting Vice President; Rahul Gandhi said, I will not comment now!!

तृणमूळ काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काल संसदेच्या पायऱ्यांवर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची मिमिक्री केली. त्यावेळी त्यांच्या भोवती जमलेले खासदार खिदळत होते. खासदार राहुल गांधी त्यांना रोखण्याऐवजी कल्याण बॅनर्जींच्या मिमिक्रीची व्हिडिओ करत उभे राहिले होते. या सर्व प्रकाराची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली. राष्ट्रपतींनी ट्विट करून या सर्व प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. खासदारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करताना सभ्यतेच्या मर्यादा पाळाव्यात, अशा परखड शब्दांत त्यांना कानपिचक्या दिल्या.



मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना फोन करून आपण गेली 20 वर्षे अपमान सहन करत आहोत, पण आपण ध्येयपथावरून विचलित झालो नाही, असे सांगितले. त्यावर उपराष्ट्रपतींनी देखील कोणताही अपमान आपल्याला देखील संविधानात्मक कार्य करण्यापासून रोखू शकणार नाही, असे आश्वस्त केले.

या सर्व पार्श्वभूमीवर संसदीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधींनी जुन्या संसद भवनात सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेसच्या खासदारांना संबोधित केले. त्यानंतर बाहेर पडताना राहुल गांधींना माध्यम प्रतिनिधींनी गाठले. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गेली 20 वर्षे तुम्ही मोदींचा अपमान करत आहात. आता उपराष्ट्रपतींचा केला आहे, असा सवाल केला. त्यावर “कमेंट नाही करूँगा”, एवढेच बोलून राहुल गांधी निघून गेले. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल देखील होते. एकूणच उपराष्ट्रपतींच्या अपमान या मुद्द्यावर कायदेशीर कारवाईच्या धास्तीने राहुल गांधी बचावात्मक पवित्र्यात गेल्याचे दिसले.

Insulted Modi for 20 years, now insulting Vice President; Rahul Gandhi said, I will not comment now!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात