कझाखस्तान – घुसखोरी हा राजकीय धोरणांचा भाग नसून इतरांना त्रास देण्याचाच प्रकार आहे. कोरोना आणि पर्यावरण बदल या संकटांविरोधात ज्याप्रमाणे जग एकत्र आले, त्याचप्रमाणे दहशतवादाचेही संकट मोठे असून त्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्य क आहे,’ असे आवाहन भारताने केले आहे. India targets Paksitan
कझाकस्तानमध्ये ‘कॉन्फरन्स ऑफ इंटरॲक्शन अँड कॉन्फिडन्स बिल्डिंग मेझर्स इन एशिया’ (सीआयसीए) या परराष्ट्र मंत्री पातळीवरील परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. ‘दुसऱ्याच्या सार्वभौमतेचा आदर करणे, हा आंतरराष्ट्रीय संबंधांचा आधार आहे.
शांतता आणि विकास ही आपली समान उद्दीष्टे असतील, तर दहशतवाद हा आपला समान आणि सर्वांत मोठा शत्रू आहे. दहशतवादाचा वापर इतर देशांविरोधात केला जाऊ नये. घुसखोरी हे राजकीय धोरण नसून तो दहशतवादाचाच एक प्रकार आहे,’ असे जयशंकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App