त्या ओळखल्या जातात सिस्को या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी फर्म मधील त्यांच्या लिडरशीपमुळे, या कंपनीत सात वर्षे त्यांनी सीटीओ म्हणून काम केले होते. त्यांनंतर त्यांनी मोटोरोला या कंपनीमध्ये पाच वर्षे सीटीओ म्हणून काम केले होते. तसेच इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या NIO USA च्या कंपनीत त्यांनी CEO म्हणूनही काम केले होते.
After working on the big hoods of big companies like Motorola, Cisco, Neo, She started her own company ‘Fable’, let’s learn about the most influential business women in the world
आंतरराष्ट्रीय पातळीवरील ह्या मोठमोठ्या कंपनीत अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावल्या नंतर त्यांनी स्वतःची फर्म चालू केली. मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी ‘सेंटर्ड क्युरेटेड रीडिंग प्लॅटफॉर्म’ वर काम करणाऱ्या फेबल नामक कंपनीच्या त्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सोबतच मायक्रोसॉफ्ट आणि Spotify कंपणींच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्येही त्यांच्या नावाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची स्थापन करणे आणि इतक्या मोठ्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये काम करणे ही त्यांच्यासाठी आणि भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे.
2014 मध्ये फोर्ब्सने त्यांना जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून घोषित केले होते. तर 2018 मध्ये टेक्नॉलॉजी फोर्ब्सच्या “अमेरिकेच्या टॉप 50 महिला टेक” मध्येही त्यांच्या नावाचा समावेश होता. चला तर पाहूया या प्रभावशाली महिले बद्दल थोडंस,
जन्म आणि शिक्षण :
पद्मश्री यांचा जन्म भारतातील आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका तेलुगु कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण विजयवाडा येथील चिल्ड्रन्स मॉन्टेसरी स्कूल येथे पूर्ण झाले तर मेरीस स्टेला कॉलेज मधून त्यांनी आपले बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी 1982 मध्ये आयआयटी दिल्ली येथून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली व त्यांनंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून केमिकल अभियांत्रिकीमध्येच पदव्युत्तर पदवी देखील प्राप्त केली होती.
मोटोरोला मधील करियर :
आपले मास्टर्स पूर्ण झाल्यावर त्यांनी 1984 मध्ये मोटोरोला या कंपनीमध्ये जॉब करण्यास सुरुवात केली. या कंपनीत त्यांनी एकूण 23 वर्ष काम केले. या 23 वर्षांच्या कालावधीत त्या मोटोरोला कंपनीच्या एनर्जी सिस्टीम ग्रुपच्या कॉर्पोरेट उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक तसेच कॉर्पोरेट उपाध्यक्ष म्हणूनही भूमिका बजावली. त्याचप्रमाणे सेमीकंडक्टर या प्रॉडक्टच्या उत्पादन क्षेत्रात मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणूनही त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती.
मोटोरोला कंपनीच्या सीटीओ बनण्यापूर्वी त्यांनी Tempe अरीझोन येथे असलेल्या मोटोरोलाचे उत्पादन असलेल्या thoughtbeam च्या महाव्यवस्थापक म्हणूनही काम केले. जानेवारी 2003 मध्ये त्या मोटोरोलाच्या CTO बनल्या. तर 2005 मध्ये त्यांना कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून पदोन्नती देण्यात आली होती.
जेव्हा त्या मोटोरोला कंपनीच्या सीटीओ म्हणून काम करत होत्या, त्या काळात म्हणजे 2004 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय पदक मोटोरोला कंपनीला प्रदान करण्यात आले होते. मोटोरोला कंपनीच्या इतिहासात कंपनीला प्रथमच हा सन्मान मिळाला होता.
मोटोरोला कंपनी सोडण्याचे कारण :
या काळात त्यांनी “सीमलेस मोबिलिटी” वर अभ्यास केला होता. आणि हेच भविष्य आहे हे ओळखून मोटोरोला कंपनी मध्ये हे तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला. एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये अखंड संवाद साधण्याची संकल्पना सिमलेस मोबिलिटी मुळे सहज शक्य आहे हीच त्यांची दूरदृष्टी होती. पण त्यांचे ते स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही. म्हणूनच त्यांनी मोटोरोला सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुढे त्या सिस्को कंपनीत रुजू झाल्या.
सिस्को :
4 डिसेंबर 2007 रोजी त्यांनी सिस्को सिस्टिम्समध्ये CTO म्हणून पदभार स्वीकारला. जून 2015 पर्यंत त्या सिस्को मध्ये कार्यरत होत्या.
NIO :
चायनीज इलेक्ट्रिकल कार कंपनी निओ(US) त्यांनी डिसेंबर 2015 मध्ये जॉईन केली. त्या कंपनीत त्या चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम पाहू लागल्या. तसेच त्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्येही होत्या. डिसेंबर 2018 मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली आणि त्यांनंतर त्यांच्या Fable ह्या कंपनीचा प्रवास सुरु झाला.
Fable :
सप्टेंबर 2019 मध्ये यांनी वॉरियर यांनी एक नवीन स्टार्टअप सुरू केले. फेबल असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे. या कंपनीच्या त्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. जानेवारी 2021 मध्ये फेबल कंपनीने त्यांचे त्याचे अँप, सबस्क्रिप्शन-आधारित पुस्तक, सजेशन इंजिन तसेच खाजगी व सोशल नेटवर्क लॉन्च केले. कॉग्निटिव्ह फिटनेस सुधारणे हाच त्यांच्या कंपनीचा मोटो आहे.
मानाचे सन्मान :
फॉर्च्यून मॅगझिनने त्यांना जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीतील ‘वन ऑफ द फोर राईझींग स्टार्स’ म्हणून संबोधले होते. त्याचप्रमाणे जगातील “सर्वाधिक वेतन” घेणाऱ्या सर्वात तरुण आणि पॉवरफुल 10 लोकांच्या यादीतही त्यांच्या नावाचा समावेश आहे होता. 2005 मध्ये इकॉनॉमिक टाइम्सने वॉरियर यांना भारतातील 11 व्या सर्वात प्रभावशाली जागतिक भारतीय म्हणून घोषित केले होते.
तर 2001 मध्ये वर्किंग वुमन मॅगझीनकडून “वुमन एलिव्हेटिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी” पुरस्कार त्यांना मिळाला होता. हा पुरस्कार देशभरातुन एकूण सहा यशस्वी उद्योजीकांना देण्यात आला होता. त्या निवडलेल्या सहा महिलांपैकी पडमश्री एक होत्या. पुन्हा 2014 साली फोर्ब्सने त्यांना जगातील 71 व्या सर्वात शक्तिशाली महिला म्हणून घोषित केले होते. तर 2018 साली फोर्ब्सच्या “अमेरिकेच्या टॉप 50 महिला टेक” मध्ये त्यांना स्थान मिळाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App