प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापुरातील पावनगडावर असलेले अनधिकृत मदरसे प्रशासनाने एका रात्रीत हटवले आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. गुप्तता पाळत काल रात्री ही कारवाई करण्यात आली. आज सकाळी ती पूर्ण झाली.Illegal madrassas at Pawangarh in Kolhapur removed overnight; Big settlement in the area!!
कोल्हापुरातल्या पावनगडावर मागच्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचे प्रकार वाढले होते. अनधिकृतपणे मदरसे उभारण्यात आलेले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.
अखेर शुक्रवारी रात्री उशिरा गुप्तता पाळत प्रशासनाने मदरसे हटवले आहेत. रात्री सुरु झालेलं पाडकाम शनिवारी सकाळी संपलं आहे. पावनगड परिसरामध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App