हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विशेष प्रतिनिधी
जयपूर : निवडणुकीच्या काही महिने आधी सुरू करण्यात आलेली गेहलोत सरकारची मोफत स्मार्टफोन योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पण, राजस्थानच्या एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सरकारच्या योजनेवर पाणी फेरले आहे. Gehlot govt gave smart phone still Grandama says she will vote only for Modi
व्हिडिओमध्ये गेहलोत सरकारकडून मिळालेला मोबाइल मिळाल्यानंतरही एक आजीबाई मत मोदींनाच देणार असल्याचं सांगताना दिसत आहे. एवढंच नाही तर हवा तर हा मोबाइलही परत घ्या असंही त्या आजीबाई म्हणाल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे काँग्रेस तोंडावर पडल्याचेच एक प्रकारे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणाने गेहलोत सरकारने दिलेला मोबाइल घेऊन बसलेल्या वृद्ध आजीला विचारले की, गेहलोत सरकारने तुम्हाला फोन दिला, कसा आहे? राजस्थानी भाषेत आजी याला चोखो म्हणजे गुड म्हणतात. त्यानंतर तरुणाने विचारले की, आता तुम्ही कोणाला मत देणार, त्यावर उत्तर देताना आजीने मोदींना मतदान करणार असल्याचे सांगितले. त्यावर तो तरुण म्हणाला की, गेहलोत सरकारने फोन दिला आहे आणि तुम्ही मोदींना मत द्याल का? त्यावर ते म्हणाले की, गेहलोत यांनी फोन परत घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more