नेहरूंचा इंदिराजींनी सोडून दिलेला वारसा मोदी पुढे घेऊन जातायेत, तरी काँग्रेससह सर्व विरोधकांचा आक्षेप??


नाशिक : केंद्रात गेल्या 9 वर्षांपासून मोदी सरकार आल्यानंतर काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ विरोधकांचा त्या सरकारवर एकच प्रमुख आक्षेप राहिला आहे, तो म्हणजे मोदी सरकार भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सर्व वारशाचा त्याग करत आहेत. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते, हा इतिहास मोदी सरकार पुसून टाकत आहे. त्यांना भारताचा इतिहास नव्याने लिहायचा आहे, पण काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसे करू द्यायला अजिबात तयार नाहीत. PM Modi may carry forward pt. Nehru’s legacy of one nation one election, but Congress may oppose it

पण एका बाबतीत नरेंद्र मोदींवर तो आक्षेप घेणे इथून पुढे काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ विरोधकांवर शक्य होणार नाही. कारण नरेंद्र मोदी हे पंडित नेहरूंचाच वारसा एका बाबतीत तरी पुढे नेण्याची दाट शक्यता आहे आणि तो वारसा म्हणजे, “एक देश, एक निवडणूक” अर्थात “वन नेशन, वन इलेक्शन” हा होय!!

4 निवडणुका एकत्रच!!

पंडित नेहरूंच्या हयातीत भारतात जेवढ्या म्हणून लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका झाल्या, त्या सर्व निवडणुका “एक देश, एक निवडणूक” अर्थात “वन नेशन, वन इलेक्शन” अशाच घडल्या होत्या. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरू पंतप्रधान झाले. पण 1950 मध्ये भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर भारताची जी पहिली निवडणूक झाली, ती 1952 मध्ये. त्यावेळी लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच दिवशी झाल्या होत्या. त्यानंतर 5 वर्षांनी 1957 मध्ये आणि परत 5 वर्षांनी 1962 मध्ये “एक देश, एक निवडणूक” याच अनुषंगाने लोकसभा आणि देशातल्या सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; मोदींनी जिंकली पुणेकरांची मनं!


1964 मध्ये पंडित नेहरूंचे निधन झाले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. पण अवघ्या दीड वर्षात त्यांचेही निधन झाले. आणि वयाच्या 48 व्या वर्षी इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या. त्यांनी अवघ्या 2 वर्षांत पण नियोजित वेळेनुसार 1967 मध्ये लोकसभा आणि देशातल्या सर्व राज्यांच्या विधानसभांच्या एकत्रितच निवडणुका घेतल्या होत्या.

या सर्व निवडणुकांमध्ये केरळ आणि तामिळनाडू सारख्या एखाद दुसऱ्या राज्याचा अपवाद वगळता सर्वत्र काँग्रेसचेच वर्चस्व राहिले होते. विरोधकांना अर्थात त्यावेळचा जनसंघ, दोन्ही कम्युनिस्ट पार्टी, स्वतंत्र पार्टी वगैरे राष्ट्रीय पक्षांना अपवादात्मक पातळीवर यश मिळाले होते. पण 1952 ते 1967 या 4 निवडणुका नियोजित वेळेनुसार म्हणजे दर 5 वर्षांनी “एक देश, एक निवडणूक” अर्थात “वन नेशन, वन इलेक्शन” याच अनुषंगाने पार पडल्या होत्या.

 इंदिरा गांधींच्या काळात साखळी तुटली

देशाचा समृद्ध लोकशाही वारसा प्रस्थापित करणाऱ्या पंडित नेहरूंचा हा वारसा इंदिरा गांधींनी त्या पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीपुरता पुढे नेला, पण त्यानंतर मात्र इंदिरा गांधींनी तो वारसा सोडून दिला आणि 1971 मध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. इथे “वन नेशन, वन इलेक्शन” ही साखळी तुटली आणि 1975 नंतर तर ती साखळी जास्तच विस्कळीत झाली, ती 2023 पर्यंत!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपण भारतीय लोकशाहीचा सगळा जुना वारसा पुनर्स्थापित करू इच्छितो, असे नेहमी म्हणत असतात. चोल साम्राज्याच्या “सेंगोल” प्रस्थापनेच्या निमित्ताने त्यांनी नव्या संसदेत त्याचे प्रत्यंतरही दिले आहे.

आता 18 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत संसदेचे जे विशेष अधिवेशन बोलवले आहे, त्या अधिवेशनात मोदी सरकार नेहरूंच्याच वारशाचे पुनरुज्जीवन करण्याच्या बेतात असल्याचे बोलले जाते. म्हणजेच मोदी सरकार या विशेष अधिवेशनात “वन नेशन, वन इलेक्शन बिल” अर्थात “एक देश, एक निवडणूक विधेयक” आणण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे, तरी देखील काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ विरोधी पक्षांचा त्या गोष्टीला विरोध आहे आणि इथेच नेमकी राजकीय विसंगती समोर आली आहे.

एकीकडे मोदी सरकारवर ते नेहरूंचा सगळा राजकीय – सामाजिक वारसा पुसत असल्याचा आरोप करायचा आणि दुसरीकडे जर मोदी सरकार “वन नेशन, वन इलेक्शन”च्या निमित्ताने नेहरूंनीच निर्माण केलेला वारसा पुढे नेत असतील, तर त्याला विरोध करायचा ही ती राजकीय विसंगती होय!!

विरोधकांचा पाय पेचात

पण यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ विरोधकांना राजकीय पेचातच अडकविले आहे. काल आणि आज विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होत असताना हा राजकीय फास मोदी सरकारने विरोधकांवर टाकला आहे. आता या त्याच्यात विरोधकांचा पाय किती अडकतो आणि ते त्या गुंत्यातून पाय कसा सोडवू शकतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

PM Modi may carry forward pt. Nehru’s legacy of one nation one election, but Congress may oppose it

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!