‘मोदींशी लढण्याआधी आपापसातील भांडणं मिटवा…’ मुख्तार अब्बास नक्वींचा I.N.D.I.A आघाडीवर टोला


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधी आघाडीच्या I-N-D-I-A चे नेते आता मुंबईत बैठक करत आहेत. युतीची तिसरी बैठक ३१ जुलै आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, विरोधकांच्या या बैठकीपूर्वी भाजपा नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी आघाडीवर हल्लाबोल केला आहे. Solve your differences before fighting WIith Modi  Mukhtar Abbas Naqvis challenge to INDIA

I-N-D-I-A आघाडीवर निशाणा साधत ते म्हणाले की, गोंधळाचा गुणाकार आणि घाईचे गणित नेहमीच बिघडते. या मेळाव्याने ते जनादेशाच्या तळापर्यंत पोहोचू शकत नाहीत. युतीवर टीका करताना भाजपा नेते मुख्तार अब्बास नक्वी पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींशी लढण्यापूर्वी आपसात भांडणे थांबवा. मोदींच्या नेतृत्वाखाली सकारात्मक बदल झाला आहे. सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्यासाठी साप-शिडीचा खेळ खेळला जात आहे. जर तुमची सुरुवात अशी होत असताना काय परिणाम होतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

उल्लेखनीय आहे की I-N-D-I-A आघाडीची तिसरी बैठक आयोजित केली जात आहे, परंतु आघाडीचे नेतृत्व कोण करणार याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत  आघाडीमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. विरोधकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे दावेदार बनवावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रियांका कक्कर यांनी बैठकीपूर्वी केली आहे.

Solve your differences before fighting WIith Modi  Mukhtar Abbas Naqvis challenge to INDIA

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात