‘अरविंद केजरीवाल पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत’, ‘INDIA’ आघाडीच्या बैठकीपूर्वी ‘आप’च्या प्रवक्त्यांचं मोठं विधान!

singapore diplomat and health ministry Takes Strong Objection On cm arvind kejriwal tweet about New Singapore Variant Of covid 19

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत  दोन  दिवसयी बैठक होत आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुंबईत होणाऱ्या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीपूर्वी आम आदमी पार्टीचे  संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘आप’च्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या, “तुम्ही मला विचाराल तर मला अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवायला आवडेल.” Arvind Kejriwal should be the candidate for the post of Prime Minister the big statement of the spokesperson of AAP before the meeting of INDIA alliance

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या बाजूने युक्तिवाद करताना, आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, “एवढ्या महागाईच्या काळातही राष्ट्रीय राजधानी दिल्लीत महागाई सर्वात कमी आहे. मोफत पाणी, मोफत शिक्षण, मोफत वीज, महिलांसाठी मोफत बस प्रवास, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा, तरीही अतिरिक्त बजेट सादर केले आहे.”

कक्कर म्हणाल्या, अरविंद केजरीवाल सातत्याने जनतेचे प्रश्न मांडतात आणि पंतप्रधान मोदींसमोर आव्हानात्मक म्हणून समोर आले आहेत. त्यांच्या पदवीचा विषय असो की आणखी काही, अरविंद केजरीवाल आक्रमकतेने बोलतात. ‘आप’चे प्रवक्ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींकडे आर्थिक दृष्टी नाही. येथील उत्पादन मायनसमध्ये गेले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या व्हिजनमध्ये भारत एक मॅन्युफॅक्चरिंग हब होईल. परवाना राज संपेल. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. व्यवसाय करा. शिक्षण इतकं चांगलं होईल की मुलं शोध लावण्याचा विचार करतील.परदेशातील लोक डॉलर खर्च करून भारतात शिकायला येतील.असा भारत आम्हाला हवा आहे.”

Arvind Kejriwal should be the candidate for the post of Prime Minister the big statement of the spokesperson of AAP before the meeting of INDIA alliance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात