मराठमोळे अजय पुरकर आता टॉलीवूड गाजवणार ! दक्षिणात्य हिरो व्हीलन समोर मोठ आवाहन!

विशेष प्रतिनिधी

पुणे : आपल्या दमदार अभिनयामुळे मराठी चित्रपट विश्वास स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे, सध्याचे आघाडीचे अभिनेते आणि गायक अजय पुरकर हे त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सध्या मैलाचा प्रवास अनुभवत आहे .
नाटक सिनेमा आणि सिरीयल या तिन्ही माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले आणि आपल्या चोखंड स्वभावातून वेगवेगळ्या कलाकृती समर्थपणे पार पाडणारे अजय पूरकर हे मराठी विश्वातील आघाडीचे अभिनेते आहेत.
अनेक नावाजलेल्या आणि दिग्गज ठरलेल्या कलाकृतींशी त्यांचं नावं जोडलेलं आहे.  Marathi actor Ajay Purkar Telugu film saknda promotion

अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात अजय पुरकर यांनी आपली एक वेगळी छाप सोडली आहे. मराठीत लिही यशाची घोडदोड बघता आता अजयपूरकर यांना दक्षिणात्य टोली उडिया इंडस्ट्रीचे दरवाजे देखील त्यांना आता उघडे झाले आहेत.

15 सप्टेंबरला रिलीज होणारा ‘स्कंदा ‘ या दक्षिणात्य ॲक्शन चित्रपटात अजय पुरकर महत्त्वाची भूमिका निभवणार आहेत. अजय पुरकर यांनी आजवर अनेक भूमिका केल्या यामध्ये पावनखिंड या सिनेमातील वीर बाजीप्रभू देशपांडे ही त्यांची भूमिका विशेष गाजली. आणि याच भूमिकेतून प्रेरित होऊन, प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक बायोपती श्रीनिवास यांनी अजय पुरकर यांना स्कंधा या सिनेमासाठी विचारलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar)

याबद्दल बोलताना जयपुरकर म्हणाले की आपल्या कामावर इतक्या बारकाईने लक्ष ठेवून आपल्या कामाची नोंद दक्षिणेतील चित्रपट सृष्टीत मोठ नावं असलेले दिग्दर्शक घेतात आणि आपल्याला त्यांच्या प्रोजेक्टसाठी विचारतातं हीच सगळ्यात मोठी पावती आहे असे पुरकर म्हणाले. तसंच हैदराबाद येथे शूटिंग करताना , कामाच्या ठिकाणी रोज वेगवेगळी पूजा करत पावित्र्य जपत काम करण्याचा अनुभव हा खूप वेगळा शिकवणारा आणि विशेष प्रेरणा देणारा ठरला.

कंदा या सिनेमाचा प्रमोशन सध्या जोरदार सुरू असून, या प्रवासादरम्यान दिग्दर्शक बायोपती श्रीनिवास यांनी अजय पुरकर यांचे भरभरून कौतुक केलं. तो व्हिडिओ समाज माध्यमातून चांगलाच व्हायरल झाला.
अजय पुरकर यांची विशेष भूमिका असणारा स्कंधा हा चित्रपट येत्या 15 सप्टेंबर रोजी रिलीज होणार असून, साउथ मधील या चित्रपटातील यांचा अभिनय पाहण्यासाठी चाहते विशेष उत्सुक आहेत .

Marathi actor Ajay Purkar Telugu film saknda promotion

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात