टेस्लाचे सीईओ एलन मस्क ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. अलीकडेच अशी बातमी आली होती की, एलन मस्क स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करू शकतात. कारण अलीकडेच त्यांनी लोकांना विचारले होते की, ट्विटर अल्गोरिदम ओपन सोर्स असावा का? या मतदानातील बहुतेक लोकांनी सांगितले की, ओपन सोर्स अल्गोरिदम गरजेचा आहेत.Fetal rich Elon Musk’s entry on Twitter, now running company with Parag Agarwal, what will change in Twitter?
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : टेस्लाचे सीईओ एलन मस्क ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. अलीकडेच अशी बातमी आली होती की, एलन मस्क स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करू शकतात. कारण अलीकडेच त्यांनी लोकांना विचारले होते की, ट्विटर अल्गोरिदम ओपन सोर्स असावा का? या मतदानातील बहुतेक लोकांनी सांगितले की, ओपन सोर्स अल्गोरिदम गरजेचा आहेत.
याआधीही त्यांनी अनेकवेळा ट्विटरवर टीका आणि कौतुकही केले आहे. आता एलन मस्क हे स्वतः ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले आहेत आणि येत्या काही महिन्यांत ट्विटरमध्ये मोठ्या सुधारणा दिसून येतील असे त्यांनी सांगितले आहे. ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एलन मस्क ट्विटरमध्ये सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
ट्विटरमधील त्यांच्या भागीदारीसोबतच आता एलन मस्क यांचाही ट्विटरच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विट करून एलन मस्क यांचे संचालक मंडळात स्वागत केले आहे.
अलीकडेच, ट्विटरचे सीईओ बनलेले पराग अग्रवाल यांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘ते एलन मस्क यांच्या बोर्डावर नियुक्तीबद्दल खूप उत्साहित आहे. आम्ही गेल्या काही आठवड्यांपासून एलन मस्कशी चर्चा करत आहोत आणि हे स्पष्ट आहे की, ते आमच्या बोर्डाचे मूल्य वाढवतील.”
Looking forward to working with Parag & Twitter board to make significant improvements to Twitter in coming months! — Elon Musk (@elonmusk) April 5, 2022
Looking forward to working with Parag & Twitter board to make significant improvements to Twitter in coming months!
— Elon Musk (@elonmusk) April 5, 2022
या ट्विटला एलन मस्क यांनी उत्तर दिले आहे. येत्या काही महिन्यांत ट्विटरमध्ये अर्थपूर्ण सुधारणा होणार असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. मी पराग अग्रवाल आणि ट्विटर बोर्डसोबत काम करेन’
पराग अग्रवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले की, एलन मस्क हे ट्विटरचे उत्कट आस्तिक आणि प्रखर टीकाकार आहेत आणि यामुळे ते बोर्डात मोठी भर घालतील. अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, ट्विटर आणि बोर्डरूमलाही या गोष्टीची गरज होती, जेणेकरून दीर्घकालीन सेवा मजबूत करता येईल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सोमवारी, एलन मस्क यांनी एसईसी फाइलिंगमध्ये सांगितले की, त्यांनी ट्विटरमध्ये 9.2% स्टेक विकत घेतला आहे. यासह एलन मस्क आता ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले आहेत, कारण ट्विटरचा एवढा हिस्सा कुणाकडेही नाही.
ट्विटरमधील स्टेक विकत घेतल्यानंतर एलन मस्क यांनी ट्विटरवर मतदान सुरू केले. या पोलमध्ये त्यांनी लोकांचे मत विचारले आहे की, एडिट बटण ट्विटरवर उपलब्ध असावे की नाही? ट्विटरवर या मतदानाला रिट्विट करताना ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल म्हणाले की, लोकांनी या मतदानाला काळजीपूर्वक प्रतिसाद द्यावा, कारण या मतदानाचा निकाल महत्त्वाचा असेल.
ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनीही इलॉन मस्क ट्विटरच्या संचालक मंडळात सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जॅक डोर्सी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘एलन मस्क ट्विटर जॉईन करत आहेत आणि मला याचा खूप आनंद होत आहे.
I’m really happy Elon is joining the Twitter board! He cares deeply about our world and Twitter’s role in it. Parag and Elon both lead with their hearts, and they will be an incredible team. https://t.co/T4rWEJFAes — jack (@jack) April 5, 2022
I’m really happy Elon is joining the Twitter board! He cares deeply about our world and Twitter’s role in it.
Parag and Elon both lead with their hearts, and they will be an incredible team. https://t.co/T4rWEJFAes
— jack (@jack) April 5, 2022
जॅक डोर्सी म्हणाले की, पराग अग्रवाल आणि एलन मस्क हे त्यांच्या मनापासून काम करतात आणि दोघेही एक उत्तम टीम म्हणून काम करतील. दरम्यान, जॅक डोर्सी यांनी पराग अग्रवालवर विश्वास दाखवला आहे आणि ते त्यांचे आवडतेदेखील मानले जातात, म्हणूनच त्यांनी ट्विटर सोडले आणि सांगितले की, पराग अग्रवालने आता ट्विटरचा ताबा घ्यावा आणि मीदेखील बोर्ड सोडतो आणि त्यांना मॅनेज करू देतो. मला असे करण्याचे स्वातंत्र्य द्यायचे आहे, जेणेकरून ते सर्व निर्णय घेऊ शकतील.
जॅक डोर्सी हेदेखील मेपर्यंत ट्विटरच्या संचालक मंडळाचा एक भाग असले, तरी त्यानंतर ते पूर्णपणे ट्विटरमधून बाहेर पडतील.एलन मस्क यांच्या आगमनाने आता ट्विटरमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. कारण वेळोवेळी एलन मस्क ट्विटरवर टीका करत होते. अलीकडेच एलन मस्क यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ट्विटर हे ओपन सोर्स असले पाहिजे, जेणेकरून वापरकर्ते आणि ट्विटर यांच्यात पारदर्शकता राहील.
एलन मस्क यांच्या या ट्विटवर हजारो लोकांनी त्यांना त्यांची मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट सुरू करण्याची मागणीही केली होती. अशी अपेक्षा होती की, एलन मस्क स्वतःची सोशल मीडिया वेबसाइट लॉन्च करणार आहेत, परंतु आता एलन मस्क स्वतः ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होण्याच्या तयारीत आहेत आणि कंपनीने त्याची घोषणादेखील केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App