शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; शैक्षणिक सुधारणांचा निर्धार!!, पण राजीनाम्याची खरी कारणे काय??

  • – CJP आंदोलकांचा जल्लोष

नाशिक: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनातली पुढची धोकादायक वळणे लक्षात घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज अखेर राजीनामा दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सविस्तर पत्र लिहून राजकीय लढाईत विद्यार्थ्यांचा बळी जायला नको म्हणून राजीनामा देत असल्याचे नमूद केले. त्याचवेळी त्यांनी शैक्षणिक सुधारणांचा निर्धार सुद्धा बोलून दाखविला.

– आंदोलनातली वाढणे

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत अनेक वळणे आली. त्यामध्ये सोनम वांगचुक याने उडी घेऊन उपोषण केल्यानंतर त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त झाली. तरीसुद्धा 25 – 26 दिवस सरकारने त्या आंदोलनाकडे लक्ष दिले नव्हते. पण संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर या आंदोलनाने वेगळे वळण घेतले. त्यामध्ये काँग्रेस सह सगळे विरोधी पक्ष शिरले. त्यांनी या आंदोलनाला राजकीय वळण दिले. त्याचबरोबर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलनच ताब्यात घ्यायचा “डाव” खेळला. राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गांधी स्मृतीस्थळावर जाऊन आंदोलन केले. या दोन्ही आंदोलनांमधून त्यांनी “इंडी” आघाडीतल्या घटक पक्षांवर आपले राजकीय नेतृत्व लादले.



– मोदी सरकारच्या कठोर कारवाया

याच दरम्यान सरकारने परीक्षा घोटाळ्यासंदर्भात कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी विधेयक मंजूर केले. ते संसदेत मंजूर करून घेण्याची तयारी चालविली. नीट पेपर फुटी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात नेला. त्यासाठी आधी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले. दरम्यान सुप्रीम कोर्टाने सरकारला आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अनेक निर्देश दिले. त्यानंतर सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधले तब्बल 47 अधिकारी बडतर्फ केले. त्याचवेळी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा चालू ठेवली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वेळा व्हिडिओ शेअर करून देशभरातल्या जनतेशी संवाद साधला. त्यांनी शैक्षणिक सुधारणा चालू ठेवण्याचा आणि विद्यार्थ्यांची संवाद चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

– खलिस्तानवादी शिरले आंदोलनात

पण त्याचवेळी विद्यार्थी आंदोलनामध्ये खलिस्तानवादी शिरल्याचे दिसून आले. खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंत सिंग याने कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला १ मिलियन डॉलर्स देणगी देण्याची घोषणा केली. याच दरम्यान दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची तपासणी केली. त्यामध्ये त्यांना 2000 समाजकंटक शिरल्याचे आढळून आले. त्याचबरोबर 400 पाकिस्तानी हँडल्सने आंदोलन हाताळल्याचे सुद्धा आढळून आले. एकीकडे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे पंजाब मधले शेतकरी हरियाणाच्या बॉर्डरवर जमले आणि त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सामील व्हायचा निर्णय जाहीर केला. तिकडे बिहारच्या औरंगाबाद मध्ये आणि पाटण्यामध्ये आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. औरंगाबाद मध्ये समाजकंटकांनी दगडफेक केली, तर पाटण्यामध्ये पोलिसांची गाडी उलटवून लावली. या सगळ्यामुळे आंदोलनातला सामाजिक हिंसाचाराचा धोका वाढला.

– मोहन भागवतांचे सूचक वक्तव्य

राहुल गांधींनी सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन “व्हिक्टिम कार्ड” खेळले. त्यांनी दोन विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे कारण देऊन त्यांना पत्रकार परिषदेत समोर आणले. त्याचवेळी त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा विषय लावून धरला. पण कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन देशभर फैलावून त्याचे हिंसाचारात रूपांतर करण्याचा “डाव” सुद्धा उघडकीला आला. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना एक प्रकारे राजीनामा देणे भाग पडले. त्यापूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सुद्धा सूचक पद्धतीने वक्तव्य केले. आमच्या तारुण्याच्या काळात सगळे ऐकणारे विद्यार्थी होते, पण आता विद्यार्थी प्रश्न विचारतात. त्यांना तार्किक उत्तर अपेक्षित असते आणि ते आपण दिले पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने जंतर – मंतरवर तुफान जल्लोष केला.

Dharmendra Pradhan steps down as education minister over NEET row

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात