वृत्तसंस्था
लखनौ : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा शुक्रवारी वाराणसीचा दौऱ्यावर दाखल होतील. हा दौरा दोन दिवसांचा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. Amit Shah starts vist in varanasi
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे सुद्धा बैठकीस उपस्थित राहतील. सोशल मीडिया शाखेचे स्वयंसेवक आणि आणि बूथ अध्यक्ष यांच्या स्वतंत्र बैठका ते घेतील.
राज्याच्या पूर्व विभागातील विभागातील लोकप्रतिनिधींच्या कामगिरीविषयी ते माहिती घेतील. ४०३ पैकी ६१ आमदार या विभागातून निवडून येतात. २०१७ मध्ये भाजपने येथे ३४ जागा जिंकत राज्यात बाजी मारली होती.
शनिवारी अमित शहा आझमगढमध्ये जाहीर सभा घेतील. तेथील विद्यापीठाचा कोनशिला समारंभ त्यांच्याहस्ते होईल. आझमगढची जनता १९७० च्या दशकापासून विद्यापीठाच्या स्थापनेची मागणी करीत होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App