जिथून फक्त दगडफेक आणि दहशतवादी चकमकीच्या बातम्या यायच्या, त्या शोपियांमध्ये हजारोंची भव्य तिरंगा रॅली!!


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू काश्मीर मध्ये काश्मीर खोऱ्यातील शोपियां जिल्ह्यातून आजपर्यंत दगडफेक आणि दहशतवादी चकमतीच्या बातम्या यायच्या, त्या शोपियांमध्ये आज भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला हजारो काश्मिरींनी एकत्र येत मोठी तिरंगा रॅली काढली. यामध्ये तरुण-तरुणींनी उत्साहात सहभाग घेतला.A grand tricolor rally of thousands in Shopian, where only news of stone pelting and terrorist encounters used to come!!

जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविण्याच्या आधी आणि नंतर देखील काही महिने याच शोपियां जिल्ह्यातून दगडफेक आणि दहशतवादी चकमकीच्या बातम्या येत असत. काश्मिरी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी शोपियां हे नंदनवन बनले होते.पण काश्मीर मधून 370 कलम हटविले. शोपियां सारख्या जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसविली. तिथे सरकारी योजनांचा हजारो नागरिकांना लाभ दिला. तेथे सुरक्षित वातावरण तयार झाले. त्याचा परिणाम म्हणून स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला हजारो शोपियावासीयांनी तिरंगा रॅली काढली. यामध्ये तरुण-तरुणींनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला.

ज्या शोपियांमधल्या चौकात भारतीय जवानांवर दगडफेक व्हायची त्याच चौकांमधून भारतीय जवानांबरोबर तिथले तरुण-तरुणी हातात तिरंगा घेऊन उत्साहाने रॅली चालले. त्यामुळेच हजारो नागरिकांना मनात विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

A grand tricolor rally of thousands in Shopian, where only news of stone pelting and terrorist encounters used to come!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात