देवेंद्र फडणवीस यांचे स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम गडचिरोलीतील दुर्गम भागात जवानांबरोबर!!


विशेष प्रतिनिधी

नागपूर : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम ते गडचिरोली दुर्गम भागात जवानांबरोबर साजरे करणार आहेत. नागपूरमध्ये शासकीय ध्वजवंदन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला जाणार असून ते काही ठिकाणी दुर्गम भागातील जवानांबरोबर स्वातंत्र्य दिनाचे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करणार आहेत. त्यांनी स्वतःच ही माहिती पत्रकारांना आज दिली. Devendra Fadnavis’ Independence Day program with jawans in remote areas of Gadchiroli!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपली दिवाळी कायम कुठल्या ना कुठल्यातरी सीमेवर जवानांबरोबर साजरी करतात. सैनिकांशी हितगुज करतात मोदींच्या या उपक्रमातून प्रेरणा घेत देवेंद्र फडणवीसही पोलीस अथवा जवानांबरोबर वेगवेगळे सण समारंभ साजरे करताना दिसतात. यंदाचा 15 ऑगस्ट देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात दुर्गम खेड्यापाड्यांमध्ये जाऊन तिथल्या जवानांबरोबर साजरा करणार आहेत.



नक्षलग्रस्त भागातील जवानांचे जीवन खडतर असते. अक्षरशः जीवन मरणाच्या सीमारेषेवर राहून हे जवान जीवाच्या जोखमीतून नागरिकांचे संरक्षण करत असतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे जीवन नीट समजून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस गडचिरोलीतील दुर्गम भागात जाऊन देशाच्या 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.

Devendra Fadnavis’ Independence Day program with jawans in remote areas of Gadchiroli!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात