योगींच्या यूपीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा पडल्या 1 कोटी रुपयांच्या महागात!!

विशेष प्रतिनिधी

लखनौ : योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणे आरोपींना 1 कोटी रुपयांच्या महागात पडले आहे. जौनपूरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याबद्दल योगी सरकारने १३ आरोपींना 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. YogiSarkar has imposed Rs 1 Crore fine on 13 accused for raising pro-Pakistan slogans during Muharram procession in Jaunpur

त्यांच्या मालकीच्या जमिनीचे मोजमाप केल्यानंतर त्यांना ₹ 5 – ₹19.80 लाखांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. या आरोपींनी दंडाचे पैसे न भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारे एकूण 33 देशद्रोही तुरुंगात आहेत. त्यापैकी 13 जणांकडे जमीन आहे. उर्वरित 20 ज्यांच्याकडे स्वत:ची जमीन नाही. त्यामुळे 13 जणांच्या जमिनी जप्त करून उर्वरित 20 जणांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोझर चालवले आहेत.

योगी सरकारने गुंड मवाल्यांना दहशत बसवण्यासाठी “बुलडोझर प्रयोग” यापूर्वी देखील केला आहे. मुख्तार अन्सारी, अतिक अहमद यांच्यासारख्या बाहुबलींना कायमचे वठणीवर आणण्यासाठी “बुलडोझर प्रयोग” फार यशस्वी ठरला होता. त्यांनी हडप केलेल्या हजारो कोटींच्या मालमत्ता योगी सरकारने गेल्या पाच वर्षात बुलडोझर चालवूनच उध्वस्त केल्या. या गुंड बाहुबलींनी हडप केलेल्या जमिनी गरिबांना वाटल्या. काही जमिनींवर प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे बांधून ती गरिबांना वाटली. आता पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिलेल्या गुंड मवाल्यांना एक कोटी रुपयांचा दंड ठोकून तो भरला नाही तर मालमत्ता जप्त करण्याचा जालीम उपाय योगी सरकारने अवलंबून त्यांना कायमची जरब बसविली आहे.

YogiSarkar has imposed Rs 1 Crore fine on 13 accused for raising pro-Pakistan slogans during Muharram procession in Jaunpur

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात