विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबर केलेला नाच गाजला. आज काँग्रेसचे केरळ मधले खासदार शशी थरुर यांचा एक फोटो गाजतोय. शशी थरूर यांनी लोकसभेतल्या महिला खासदारांची समावेत आपला एक फोटो ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि त्यावर त्यांनी लिहिले आहे, की कोण म्हणतं लोकसभेत काम करणे आकर्षक नसते?? माझ्या या महिला सहकारी खासदारांना समावेत मी!! Yesterday Sanjay Raut – Supriya Sule’s dance rang out; Today Shashi Tharoor’s photo is playing !!
Who says the Lok Sabha isn’t an attractive place to work? With six of my fellow MPs this morning: @supriya_sule @preneet_kaur @ThamizhachiTh @mimichakraborty @nusratchirps @JothimaniMP pic.twitter.com/JNFRC2QIq1 — Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 29, 2021
Who says the Lok Sabha isn’t an attractive place to work? With six of my fellow MPs this morning: @supriya_sule @preneet_kaur @ThamizhachiTh @mimichakraborty @nusratchirps @JothimaniMP pic.twitter.com/JNFRC2QIq1
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 29, 2021
शशी थरूर हे नेहमीच अशा हटके फोटोंबद्दल किंवा ट्विट बद्दल चर्चेत असतात. संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. कामकाज बंद पाडणे यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत पण शशी थरुर यांचा महिला खासदारांची समवेत नावे शेअर केलेला फोटो गाजतोय. या फोटोमध्ये तृणमूळ काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, कॅप्टन अमरेंद्र सिंह यांच्या पत्नी खासदार परणीत कौर आणि अन्य दोन महिला खासदारांचा समावेश आहे.
कालच संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा एकत्रित नाच गाजला आहे. सोशल मीडियावर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स झाल्या आहेत आणि आज शशी थरुर यांचा फोटो गाजतो आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे अग्रभागी दिसत आहेत. संसदेत संसदेत कृषी कायद्यांवरून गदारोळ सुरू असताना दोन खासदार संजय राऊत आणि शशी थरूर हे वेगळ्या कारणांमध्ये कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App