Winter Session : लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब, विरोधक म्हणाले- कृषी कायद्यांवर चर्चा झाली नाही तर कामकाज चालू देणार नाही!


आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. याबरोबरच संसदेतील राजकीय पाराही चढला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे तीन विद्यमान कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव लोकसभेत मांडणार आहेत. सभागृह सुरू होण्यापूर्वी काँग्रेसने विरोधकांची बैठक बोलावली. Lok Sabha proceedings adjourned till 12 Noon, opposition said – agricultural laws Must be discussed


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. याबरोबरच संसदेतील राजकीय पाराही चढला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे तीन विद्यमान कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव लोकसभेत मांडणार आहेत. सभागृह सुरू होण्यापूर्वी काँग्रेसने विरोधकांची बैठक बोलावली.

लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृह दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कृषी कायद्यांवर चर्चेची मागणी करत विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

चर्चा नाही तर संसदेचे कामकाज चालू देणार नाही – विरोधक

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधकांनी चर्चा केली नाही तर संसद चालू देणार नाही, असे सांगितले, त्यावर सरकारने म्हटले की, आम्ही कायदा रद्द करतो, मग चर्चा कशासाठी?

ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांसोबत पंतप्रधानांची बैठक

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ कॅबिनेट मंत्री, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची बैठक घेतली.

काँग्रेसच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी सोनिया गांधी पोहोचल्या

तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या केंद्राच्या मागणीसाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या निषेधाचे नेतृत्व केले. दरम्यान, TRS खासदार नामा नागेश्वर राव यांनी ‘अन्न खरेदीवरील राष्ट्रीय धोरण’ यावर चर्चा करण्यासाठी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली.

Lok Sabha proceedings adjourned till 12 Noon, opposition said – agricultural laws Must be discussed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण