आयटी कंपन्यांचा महसूल 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार, साडेचार लाख लोकांना मिळणार पुढील वर्षी नोकरी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्या पुढील आर्थिक वर्षात 4.5 लाख लोकांना रोजगार देतील. या काळात त्यांचा महसूल प्रथमच 200 अब्ज म्हणजेच 15 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल, अशी माहिती नेस्कॉम रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.The revenue of IT companies will be more than Rs 15 lakh crore, four and a half lakh people will get jobs next year

आयटी इंडस्ट्री बॉडी नॅसकॉमने म्हटले आहे की 2022-23 म्हणजेच एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत महिलांना रोजगार देण्याच्या बाबतीत हे क्षेत्र प्रथम क्रमांकावर असेल. यामध्ये सुमारे 18 लाख महिला असतील. पुढील वर्षात भारतीय आयटी उद्योगाच्या महसुलात 30 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 2.25 लाख कोटी रुपयांची वाढ होऊ शकते.ही 15 लाख कोटींच्या पुढे जाईल. आयटी उद्योग कोरोनापूर्वी 2019 च्या दुप्पट वेगाने वाढेल. हे 227 अब्ज डॉलरचे क्षेत्र असेल. त्यामुळे यामध्ये सहभागी कर्मचा?्यांची एकूण संख्या 50 लाखांच्या पुढे जाईल. आयटी सेक्टरने गेल्या 10 वर्षांत 100 अब्ज डॉलर(रु. 7.5 लाख कोटी) कमाई केली आहे.

उद्योगाला 178 अब्ज डॉलर निर्यात महसूल मिळण्याचा अंदाज आहे, जो 17% ने वाढण्याची अपेक्षा आहे. उर्वरित महसूल देशांतर्गत बाजारातून येईल. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, कोविड-19 चा प्रभाव असूनही या क्षेत्राने गेल्या दोन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला भारताच्या आयटी उद्योगाबद्दल अधिक आत्मविश्वास मिळाला आहे. सरकारच्या सुधारणांचे या क्षेत्राने कौतुक केले आहे.

टॉप 5 माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात 1.82 लाख फ्रेशर्सना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा रोजगार आर्थिक वर्ष म्हणजे एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान उपलब्ध असेल. या पाच कंपन्यांमध्ये इन्फोसिससह टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस , विप्रो आणि टेक महिंद्रा यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्या प्रचंड नफा कमावतात.

गेल्या वर्षी या कंपन्यांनी 80 हजार फ्रेशर्सना रोजगार दिला होता, त्या तुलनेत आता 120% जास्त नोकºया दिल्या जाणार आहेत. फ्रेशर्सना नोकरी देण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी नोकरी सोडतात. जानेवारी ते डिसेंबर 2021 दरम्यान या कंपन्यांनी 2.3 लाख लोकांची भरती केली होती. देशातील सर्वात मोठी कंपनी ळउर यावेळी 78 हजार लोकांना नोकºया देणार असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षी 40 हजार जणांची भरती झाली.

The revenue of IT companies will be more than Rs 15 lakh crore, four and a half lakh people will get jobs next year

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी