नागपूर ते मुंबई साडेतीन तासांत करा प्रवास; ३५० किलोमीटर वेगाने धावणार बुलेट ट्रेन


वृत्तसंस्था

नागपूर : नागपूर ते मुंबई साडेतीन तासांत प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. हा प्रवास बुलेट ट्रेनच्या माध्यमातून करता येणार आहे. केंद्र सरकारने तसा प्रस्ताव दिला आहे.  ताशी ३५० किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. The Mumbai-Nagpur Samrudhi Expressway will run along the route

केंद्र सरकार विविध रेल्वे मार्गांवर बुलेट ट्रेन सुरु करण्याची योजना आखात आहे. भारतीय रेल्वेने आता महाराष्ट्रात नागपूर ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही शहरांमधील ७६६ किमीचे अंतर बुलेट ट्रेनने ३.५ तासांत कापले जाऊ शकते. समृद्धी द्रुतगती मार्गाच्या बाजूने ते बांधण्याचे प्रस्तावित आहे.वेग ३५० किमी प्रति तास

नागपूर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३५० किमी असेल, असे मानले जात आहे. सध्या ७६६ किमीचे हे अंतर १२ तासांत कापले जाते. प्रस्तावित मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) या महिन्याच्या अखेरीस किंवा पहिल्या आठवड्यात तयार होईल, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

The Mumbai-Nagpur Samrudhi Expressway will run along the route

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण