काश्मीरमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के


विशेष प्रतिनिधी

जम्मू : काश्मीरमध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज पहाटे 5.43 वाजता पहलगामपासून 15 किमी दक्षिण-नैऋत्य भागात 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. भूकंपामुळे जीवित किंवा मालमत्तेला कोणताही धोका झाल्याचे वृत्त नाही. Early morning earthquake in Kashmir

यापूर्वी राज्यातील पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये 10 फेब्रुवारीला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 3.8 मोजली गेली. याशिवाय 5 फेब्रुवारी रोजी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी तीव्रता 5.7 मोजली गेली होती. उधमपूर, डोडा, जम्मू विभागात तसेच किश्तवाड, पुंछ तसेच काश्मीर खोऱ्यातही धक्के जाणवले गेले होते.



नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या आकडेवारीनुसार, देशात एका वर्षात 965 किरकोळ आणि मोठे भूकंप झाले. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत देशात एकूण 965 लहान-मोठे भूकंपांची नोंद झाली. दिलासादायक बाब म्हणजे हे सर्व भूकंप कमी तीव्रतेचे होते, त्यामुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही.

Early morning earthquake in Kashmir

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात