पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा, ३६ किलो ड्रग जप्त; सीमा सुरक्षा दलाची जम्मू – काश्मीरमध्ये कारवाई

वृत्तसंस्था

श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत तीन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा केला असून ३६ किलो ड्रग जप्त केले आहे. सीमावर्ती सांबा भागात ही कारवाई केली. Jammu and Kashmir: BSF kills three Pakistani infiltrators, seizes 36 kg of drugs

कारवाईनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.दरम्यान,  शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले होते.दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीवर कारवाई करत, सुरक्षा दलांनी रात्री शहराच्या जाकुरा भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दल परिसरात शोध मोहीम राबवत होते, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

Jammu and Kashmir : BSF kills three Pakistani infiltrators, seizes 36 kg of drugs

महत्त्वाच्या बातम्या