LATA MANGESHKAR: गानसम्राज्ञी लता मंगेशकर -त्यांना नेहमीच एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता… पंतप्रधान नरेंद्र मोदीं भावूक…

  • स्वरलता, गानकोकिळा, दैवी आवाजाची देणगी लाभलेली गानसरसरस्वती..
  • शेकडो अद्वितीय विशेषणांनी नावाजलेल्या महान गायिका लता मंगेशकर..

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशासह जगभर शोककळा पसरली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. लता दीदींच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. lata mangeshakar passed away

मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या.

त्यांच्या यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये एक प्रकारची न भरुन निघणारी पोकळी निर्माण असल्याची भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती. अशा आशयाचे ट्विट करत लता दीदींच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

तसेच, दुसरे ट्विट करत लता दीदींनी अनेक दशकांपासून भारतीय चित्रपट जगतातील स्थित्यंतरे जवळून पाहिली. चित्रपटांच्या पलीकडे, त्यांना नेहमीच भारताच्या प्रगतीबद्दल उत्कटता होती. त्यांना नेहमीच एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता. अशी भावनादेखील मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांनी वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला.

lata mangeshakar passed away

महत्त्वाच्या बातम्या