मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दाऊदचा हस्तक, दहशतवादी अबू बकरला भारतात आणणार


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दहशतवादी अबू बकरला भारतात आणले जाणार असून तो दाऊदचा हस्तक आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू बकर याला यूएईमधून अटक करण्यात भारतीय तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले. ही अटक यूएई एजन्सींच्या सहकार्याने केलेली असून त्याला लवकरच भारतात आणले जाईल. अबू बकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा मानला जातो. त्याच्या अटकेसाठी ऑपरेशन सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून तो पाकिस्तान आणि यूएईमध्ये लपून बसल्याची माहिती मिळत होती. Dawood’s accomplice in Mumbai chain bomb blast, terrorist Abu Bakr will be brought to India

मुंबईत १९९३ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. ज्यामध्ये २५७ लोकांचा मृत्यू तर ७१३ लोक जखमी झाले होते. २७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले होते. अबू बकरला २०१९ मध्ये अटक झाली होती. भारतीय एजन्सींनी मुंबई बॉम्बस्फोटाचा अबू बकर याला यूएई मधूनच अटक केली होती. त्यानंतर कागदपत्रांअभावी त्याच्यावरील आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे यूएईच्या अधिकाऱ्यांनी त्याला सोडून दिले. मात्र, पुन्हा भारतीय यंत्रणांना यश मिळाले असून आता त्यांनी त्याला भारतात आणण्याची तयारी सुरू आहे.



अबू बकर हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवणे आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देणे यासारख्या कारवायांमध्ये सहभागी आहे. दहशतवादी अबू बकर याने मुंबई बॉम्बस्फोटासाठी भारतात मोठ्या प्रमाणात आरडीएक्स आणल्याचा आरोप आहे.

१९९७ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी

अब्दुल गफूर शेख आणि मुस्तफा डोसा यांच्यासोबत अबू बकरचाही तस्करी प्रकरणात सहभाग आहे. तो आखाती देशांतून मुंबईत सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्सची तस्करी करत असे. त्यानंतर १९९७ मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतरच भारतीय एजन्सी त्याचा शोध घेत होती.

दाऊदच्या सांगण्यावरून स्फोट

१२ मार्च १९९३ रोजी झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. पहिला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीबाहेर झाला. त्यावेळी त्या इमारतीत २००० हून अधिक लोक होते. इमारतीतील लोकांना काही समजल्यानंतर ४५ मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. यावेळी स्टॉक एक्स्चेंजपासून जवळ एअर इंडिया इमारतीच्या पार्किंगमध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर सर्वत्र मृतदेहांचे ढीग साचले होते. यानंतर मुंबईच्या विविध भागात आणखी १० बॉम्बस्फोट झाले. हे सर्व बॉम्बस्फोट दाऊद इब्राहिमच्या सूचनेवरून करण्यात आले. या स्फोटात सहभागी असलेले सर्व दहशतवादी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित होते. या दहशतवाद्यांमध्ये अबू सालेम आणि फारुख टकला यांसारख्या लोकांचाही समावेश होता, ज्यांना भारतीय तपास यंत्रणांनी पकडले होते. मात्र, या स्फोटाचा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही.

Dawood’s accomplice in Mumbai chain bomb blast, terrorist Abu Bakr will be brought to India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात