पंजाब विधानसभेच्या तोंडावर कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सोडला पक्ष, नेतृत्व प्रेरणादायी नसल्याचा केला आरोप


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिला नाही. आमच्याकडे पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी परिवतर्नवादी आणि प्रेरणादायी नेतृत्व नाही, असे म्हणत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अश्विनीकुमार यांनी पक्ष सोडला आहे. मी राजकारणही सोडले नाही आणि जनसेवा देखील सोडलेली नाही. मी देशाप्रती माझे कर्तव्य पार पाडत राहीन, असे सांगत त्यांनी दुसºया पक्षात जाण्याचे संकेतही दिले आहेत.Fwd: In the face of the Punjab Assembly, a senior Congress leader quit the party, accusing the leadership of not being inspiring

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अश्विनी कुमार हे अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांचे राज्यमंत्रीही होते. तसेच जानेवारी २०११ ते जुलै २०११ पर्यंत ते संसदीय राज्यमंत्री देखील होते. याशिवाय अश्विनी कुमार हे सर्वात तरुण अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल देखील राहिले आहेत. १९९१ मध्ये अश्विनी कुमार यांना देशाचे अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल बनवण्यात आले होते.अश्विनीकुमार यांनी म्हटले आहे की, हा एक वेदनादायक निर्णय होता. मी खूप विचार केला आणि लक्षात आले की आज ज्याप्रकारे काँग्रेसची अंतर्गत प्रक्रिया चालू आहे, मी माझ्या सन्मानाने आणि स्वाभिमानाने आता आणखी पुढे जाऊ शकत नाही. मला वाटलं की माझे खांदे एवढे मजबूत नाहीत की उदासीनेतेचा भार सहन करतील.

याबाबत विचार केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, सध्याच्या परिस्थितीत आणि माझ्या प्रतिष्ठेनुसार मी पक्षाच्या बाहेर राष्ट्रीय कार्य अधिक योग्य प्रकारे करू शकतो. ४६ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मी पक्ष सोडत आहे आणि आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी कल्पना केलेल्या उदारमतावादी लोकाशाहीच्या वचनावर आधारित परिवतर्नवादी नेतृत्वाच्या विचाराने प्रेरित सार्वजनिक कारणाचा सक्रियपणे पाठपुरवा करण्यास उत्सुक आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांना काँग्रेसने अपमानित केले. त्याचा प्रतिकुल परिणाम राज्यातील मतदारांवर पडला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे नव्हे तर आपचे सरकार सत्तेवर येऊ शकेल, असेही अश्विनीकुमार यांनी म्हटले आहे.

Fwd: In the face of the Punjab Assembly, a senior Congress leader quit the party, accusing the leadership of not being inspiring

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी