Quit Tobacco App: तंबाखूच्या व्यसनापासून मुक्तता मिळवण्यासाठी ‘क्विट टोबॅको ॲप’ ; जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम…


विशेष प्रतिनिधी

मुंबई: जगभरातील युवकांमध्ये सिगारेट ओढण्याच्या व्यसनामध्ये वाढ झाल्याचं अनेक आकडेवारीतून दिसून येतंय. आता यावर जागतिक आरोग्य संघटनेनं उपाय शोधला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं क्विट तोबॅको अॅप (Quit Tobacco App) लॉन्च केलं असून त्यामाध्यमातून सर्व प्रकारच्या तंबाखूच्या व्यसनापासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत होईल असा दावा करण्यात येतोत.Quit Tobacco App

सर्वच प्रकारातील तंबाखू हा पदार्थ आरोग्यासाठी जीवघेणा आहे. समाजामध्ये खासकरून युवकांमध्ये या व्यसनाची वाढ होताना दिसतेय आणि ते नक्कीच चिंताजनक आहे. त्यावर उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं आता Quit Tobacco App लॉन्च केलं आहे. ज्यांना तंबाखूचे व्यसन सोडायचं आहे त्यांना हे अॅप मदतशीर ठरेल, या अॅपच्या माध्यमातून जनजागृती होईल असं जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाचे प्रादेशिक संचालक खेत्रपाल सिंह यांनी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं लॉन्च करण्यात आलेले हे पहिलेच अॅप आहे. या माध्यमातून तंबाखूच्या सर्व प्रकारच्या व्यसनापासून सुटका होण्यास मदत मिळेल. तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी त्या व्यक्तीला मदतशीर ठरेल, त्या व्यक्तीला तंबाखूची तल्लफ कमी करण्यास मदतशीर ठरेल. त्यामुळे समाजातील व्यसनाधीनता कमी होईल.

दरवर्षी 80 लाख लोकांचा मृत्यू
तंबाखूच्या व्यसनामुळे जगभरात दरवर्षी 80 लाख लोकांचा मृत्यू होतो अशी जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. त्यामध्ये आग्नेय आशियातील 16 लाख लोकांचा मृत्यू होतो. भारताचा समावेश असलेल्या आग्नेय आशियामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्त्पादन घेतलं जातं. तसेच या प्रदेशात तंबाखूचे सर्वाधिक सेवन केलं जातं.

 

Quit Tobacco App

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय