संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांचे खोचक ट्विट!!; कोणते ते पहा!!


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या आजच्या पत्रकार परिषदेवर राजकीय पक्षांच्या जोरदार क्रिया – प्रतिक्रिया आल्या आहेत. अजूनही येत आहेत.MNS leader Sandeep Deshpande’s scathing tweet at Sanjay Raut’s press conference

महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संजय राऊत यांचे जोरदार समर्थन करणारी ट्विट केली आहेत. पण यातले सर्वात वेगळे ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचे आले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांची पाठ थोपटली आहे. भाजप नेते स्वत:ला धुतल्या तांदळासारखे समजतात. परंतु, संजय राऊत यांनी त्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणला आहे, असे टीकास्त्र नाना पटोले यांनी सोडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाना पटोले यांच्या सुरात सूर मिसळत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा दिला आहे. भाजपाने नेत्यांवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी राज्यसरकार करेलच, अशी खात्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

पण त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतले नेते संदीप देशपांडे यांनी अत्यंत खोचक ट्विट केले आहे. यामध्ये एक वाघ त्यांनी दाखवत #आजची पत्रकार परिषद”, एवढाच हॅशटॅग त्यामध्ये वापरला आहे. हे ट्विट काही दिवसांपूर्वीचे आहे. परंतु या निमित्ताने ते पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे. या ट्विटवर अनेकांच्या खोचक प्रतिक्रियाही आल्या आहेत. तसेच या शेलक्या आणि खोचक ट्विटची राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा आहे.

MNS leader Sandeep Deshpande’s scathing tweet at Sanjay Raut’s press conference

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात