शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना आपल्यावर झालेल्या आरोपांचे निराकरण करण्यासाठी अर्थात आपली बाजू मांडण्यासाठी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्याची संधी दिली.Sanjay Raut was given an opportunity to hold a press conference at Shiv Sena Bhavan
शिवसेना भवनाचा इतिहास पाहिला तर स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदा तिथे झाल्याचे आठवते. मात्र, शिवसेनेच्या बाकीच्या नेत्यांना शिवसेना भवनात थेट पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या वतीने बाजू मांडण्याची वेळ फारच क्वचित आणि दुर्मिळ होती. ही संधी आज संजय राऊत यांना देण्यात आली.
परंतु ईडी सारख्या केंद्रीय तपास संस्थांच्या चौकशीच्या आणि तपासाच्या फेऱ्यात फक्त संजय राऊत हे एकटेच अडकलेले नाहीत तर 900 कोटींचा बँक घोटाळ्यात माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, खासदार भावना गवळी, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब, रवींद्र वायकर यांच्यासारखे वरिष्ठ शिवसेना नेतेही विविध घोटाळ्यांसाठी चौकशी आणि तपासाच्या फेऱ्यात अडकले आहेत. याखेरीज शिवसेनेच्या 10 ते 12 आमदारांवर विविध तपास संस्थांकडून संस्थानच्या स्कॅनर खाली आहेत.
संजय राऊत यांना जशी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्याची संधी देण्यात आली, तशी संधी शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इतर नेत्यांना देणार का??, असा सवाल आता उपस्थित होत आहे. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेनेचे वरिष्ठ नेते दिवाकर रावते यांना आपल्या शेजारी बसवून घेतले होते. त्यांच्या शेजारी आनंदराव अडसूळ होते. मात्र, फक्त पत्रकार परिषदेत फक्त संजय राऊत बोलले. आनंदराव अडसूळ बोललेच नाहीत. याचा अर्थ आनंदराव अडसूळ स्वत:हून बोलले नाहीत?, की त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही?, असा सवालही उपस्थित होत आहे.
– अनिल परब, भावना गवळी का नव्हते??
त्याच बरोबर शिवसेनेच्या अनेक नेत्यांना पत्रकार परिषदेत जास्त व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. परंतु आरोप असलेले आणि चौकशीच्या फेर्यात अडकलेले अनिल परब, भावना गवळी, रवींद्र वायकर हे पत्रकार परिषदेला उपस्थितच नव्हते. याचा अर्थ शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांनी या तिने त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी शिवसेना भवन उपलब्ध करून दिले नाही का?? तेथे या नेत्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली नाही का??, अशा सवालांचेही उत्तर अद्याप कोणाला मिळालेले नाही…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App