सर्जीकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर आसाममध्ये होणार गुन्हा दाखल


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी: सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याच्या आरोपावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.याच मुद्यावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि राहुल गांधी आमने-सामने आले होते.Fwd: A case will be filed against the Telangana Chief Minister in Assam for demanding evidence of a surgical strike

अनेक भाजप समर्थकांकडून तक्रार मिळाल्यानंतर आता आसाममधील पोलिसांकडून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनीही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या विधानाचे समर्थन केले होते.



तसेच पुरावे मागण्यात गैर काय? असं वक्तव्य केलं होतं. मात्र, भारतीय सैन्याला याप्रकारे पुरावे मागणाऱ्या विधानामुळे भारतविरोधी भावनांना खतपाणी घातलं जात असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.पुलवामा हल्ल्याच्या तिसºया वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येलाच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील भाजप सरकारवर तोफ डागली आहे.

ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला. यामध्ये काही चुकीचं नाही. प केवळ राहुल गांधींनाच नाही, तर मलाही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावेही पाहायचे आहेत. लोकांच्या मनात याबाबत आशंका आहे हे भारत सरकारला दाखवू द्या.

लोकशाहीत तुम्ही राजा किंवा सम्राट नसता, असंही विधान करत ते म्हणाले की, भाजप सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय वापर करत आहे. लष्कर सीमेवर लढत आहे. जर कोणी मरत असेल तर ते लष्कराचे जवान आहेत, आणि त्यांच्या मरणाचे श्रेय भाजपला दिले पाहिजे.

Fwd: A case will be filed against the Telangana Chief Minister in Assam for demanding evidence of a surgical strike

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात