पोस्ट ऑफिसमध्ये कोरोनाविरोधी लसीकरण नोंदणी; तेलंगणाच्या ग्रामीण भागात सुविधा


वृत्तसंस्था

हैदराबाद : कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेत आता टपाल विभागाने सामान्य लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत कोरोना लसीकरणासाठी पोस्ट ऑफिसमध्ये नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे तेलंगण राज्यातील ग्रामीण भागात लसीकरण नोंदणी सुविधेला प्रारंभ झाला आहे. Corona vaccination at the post office Registration; Facilities in rural area of Telangana State

तेलंगणाच्या ग्रामीण भागात नुकतीच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्या लोकांकडे स्मार्टफोन आहेत, पण ते कोविन अॅप योग्य प्रकारे वापरण्यास सक्षम नाहीत अशा व्यक्तींना या सुविधेचा फायदा होणार आहे. तेलंगणातील 36 पोस्ट ऑफिस, 643 सब पोस्ट ऑफिस आणि 10 ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.



कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांची पंचायत होत होती. ज्यांच्याकडे फोन असला तरी नोंदणी करताना अनेकदा समस्या येत आहेत. ते आता जवळच्या पोस्ट ऑफिसची नोंदणीसाठी मदत घेऊ शकतात.

Corona vaccination at the post office Registration; Facilities in rural area of Telangana State

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात