जम्मू-कश्मीर! पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेते त्रालचे नगराध्यक्ष राकेश पंडिता सोमनाथ यांचा मृत्यू


भाजपा नेते राकेश पंडिता काश्मीरमध्ये पक्षाचे काम पुढे नेण्यात गुंतले होते. मोठ्या प्रमाणात तरुणांना पक्षात सामील करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.


पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले भाजप नेते राकेश पंडित यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.BJP leader Rakesh Pandita killed in terrorist attack in J-K’s Pulwama


विशेष प्रतिनिधी

जम्मू काश्मीरः  पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले भाजप नेते राकेश पंडिता यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राकेश पंडिता यांच्यावर त्यांच्या घराजवळ गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारात राकेश पंडिता गंभीर जखमी झाल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

पुलवामा जिल्ह्यातील त्राल शहराचे नगराध्यक्ष

राकेश पंडिता हे पुलवामा जिल्ह्यातील त्राल शहराचे नगराध्यक्ष होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटद्वारे घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ट्विट केले की, “दहशतवाद्यांनी त्रालमध्ये नगरसेवक राकेश पंडिता यांना गोळ्या घालून ठार केले. श्रीनगरमध्ये 2 पीएसओ आणि सुरक्षित हॉटेल सुविधा उपलब्ध करून दिली असतानाही राकेश पंडिता पीएसओविना त्रालला गेले होते. त्या परिसराला आता घेराव घातला गेला असून, पोलिसांनी सर्च मोहीम सुरू केलीय. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, आज संध्याकाळी त्राल नगरपालिकेचे नगराध्यक्ष राकेश पंडिता सोमनाथ यांना तीन अज्ञात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकताच आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले. जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या राकेश पंडित यांना उचलून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

BJP leader Rakesh Pandita killed in terrorist attack in J-K’s Pulwama

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात