झिरवाळांचा उल्लेख आदिवासी : जयंत पाटलांच्या डोक्यात जातीवाद; गोपीचंद पडळकरांचे शरसंधान


प्रतिनिधी

मुंबई : राज्यपालांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज रविवारी 3 जुलै रोजी राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा उल्लेख आदिवासी म्हणून केल्यामुळे भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. Racism in Jayant Patil’s head; Sharsandhan of Gopichand Padalkar



राष्ट्रवादीची परंपरा 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविषयी जे बोलले त्यावरून त्यांची सत्ता गेली तरी त्यांचा माज गेला नाही.

त्यांचा माजुर्डेपणा जायला तयार नाही. सभागृहात चर्चा करत असताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गेल्या अडीच वर्षांत खूप चांगले काम केले आहे. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. पण त्यांचा उल्लेख करताना जयंत पाटील यांनी त्यांच्या समाजाचा उल्लेख केला आहे. यावरून त्यांच्या डोक्यातून अजून जातीवाद जायला तयार नाही, हेच दिसते, अशी टीका पडळकर यांनी केली

आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, भटक्या विमुक्त समाज असेल, या समाजातून कोणी लोकप्रतिनिधी चांगले काम करत असेल, तरी त्या लोकांचा अपमान करणे, त्या लोकांच्या समाजाबद्दल बोलणे, अशी परंपरा या राष्ट्रवादीवाल्यांनी चालू ठेवली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांचा जाहीर निषेध आहे. आम्हीच या राज्यात चांगले काम करू शकतो असे जे चित्र, बुडबुडा त्यांनी निर्माण केला आहे, ते लवकरच फुटल्याशिवाय राहणार नाही, असे टीकास्त्रही पडळकर यांनी सोडले.

Racism in Jayant Patil’s head; Sharsandhan of Gopichand Padalkar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात