राज्यपालांच्या भूमिकेवरून जयंत पाटलांचे टोले; नानांचे आभार मानत फडणवीसांचे प्रतिटोले!!


प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा अधिवेशनात अध्यक्षांच्या निवडीच्या मुद्द्यावरून सुरुवातीच्या काळात थोडे प्रतिटोले पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल महोदयांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला परवानगी दिली नाही. यावरून जयंत पाटलांनी त्यांना टोला लगावला. Jayant Patil’s team from the role of Governor


ShivJayanti : तिथीनुसार शिवजयंती; मनसे काँग्रेस आमने-सामने; भाई जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!!


 

जयंत पाटलांचा टोला

आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात वारंवार विनंती करूनही राज्यपालांनी अध्यक्षांच्या निवडणुकीचे परवानगी दिली नाही. पण नवीन सरकार येताच पहिली परवानगी अध्यक्ष निवडीची दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा जो प्रस्ताव दिला आहे तो देखील असाच मंजूर करावा. त्यामुळे ते नि:पक्ष राज्यपाल आहेत आणि सगळ्यांचे राज्यपाल आहेत हे सिद्ध होईल, असा टोला जयंत पाटलांनी लगावला या टोल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रति टोला लगावला.

– फडणवीसांचा प्रतिटोला

काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे नव्या सरकारला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची संधी मिळाली. याबद्दल मी नाना पटोले यांचे आभार मानतो. ते माझे मित्र आहेत, असा प्रतिटोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष पदापासून वंचित ठेवले होते त्याचा परिणाम म्हणून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक करण्याची संधी विद्यमान शिंदे – फडणवीस सरकारला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर अशा टोला प्रतिटोल्यांनीच्या पण हसत खेळत वातावरणात विधानसभा अधिवेशनाला सुरुवात झाली.

Jayant Patil’s team from the role of Governor

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती