अरे व्वा ! राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण मोहीम; नागरिकांना दिलासा


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात रविवारपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. Oh wow ! Vaccination campaign for citizens in the age group of 30 to 44 in the state from today; Consolation to the citizens

मुंबई महापालिका क्षेत्रातील 10 शासकीय लसीकरण केंद्रावर 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस दिली जाईल. या 10 लसीकरण केंद्रावर नागरिकांना सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाईल. प्रत्येक केंद्रावर लशींचे दिवसाला 200 डोस आजपासून उपलब्ध असतील.

केंद्रावर लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन करता येणार आहे. 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल होणार आहेत. दुसरीकडे 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबईत येथे होणार लसीकरण

मुंबईतील प्रियदर्शनी पार्क- वाळकेश्वर, बीएमसी मुरली देवरा नेत्र रुग्णालय-कामठीपुरा, अकवर्थ लेपरसी-वडाळा, सेठ आयुर्वेदिक रुग्णलाय- सायन, केबी भाभा रुग्णालय- बांद्रा, एम डब्ल्यु देसाई रुग्णालय- मालाड, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय – बोरिवली ,देवनार मॅटर्निटी होम- देवनार, जॉली जिमखाना-विद्याविहार, वि.दा. सावरकर रुग्णालय- मुलुंड या दहा लसीकरण केंद्रावर 30 ते 44 नागरिकांचा लसीकरण सुरू होत आहे.

पुण्यात १३ शासकीय केंद्रांवर मोहीम

पुण्यात १३ शासकीय केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. त्यासाठी महापालिकेने 13 ठिकाणांची निवड केली आहे.

लस २१ जूनपासून मुबलक

1 मे पासून तिसऱ्या टप्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली होती. मात्र, लशींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईत 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचा लसीकरण शासकीय लसीकरण केंद्रावर काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला होता. लशींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण सुरू असताना प्राधान्याने 45 वयोगटावरील व्यक्तींना लस दिली जात आहे. आता लशींच्या पुरवठ्याचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे असल्याने 21 जूनपासून मुबलक प्रमाणात लस मिळणार असल्याने टप्याटप्याने 45 वयोगटाखालील व्यक्तींचे लसीकरण पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे, सुरुवातीला आजपासून लसीकरण सुरू केले जात आहे.

Oh wow ! Vaccination campaign for citizens in the age group of 30 to 44 in the state from today; Consolation to the citizens

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती