विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील प्राणिसंग्रहालयातील सिंहाचे आगमन कोविडमुळे लांबले आहे. महापालिकेला सिंहाच्या बदल्यात इतर प्राणिसंग्रहालयांना झेब्रा द्यायचा आहे; मात्र कोविडमुळे परदेशातून झेब्रा आणण्याची परवानगी पालिकेला अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे सिंहाचे आगमन लांबले आहे. Lions will delayed to came in mumbai
गुजरातमधील सक्कर बाग प्राणिसंग्रहालय आणि इंदौर प्राणिसंग्रहालयातून महापालिका मुंबईत दोन सिंहाच्या जोड्या आणणार आहे. त्यासाठी या प्राणिसंग्रहालयांना झेब्राची जोडी द्यायची आहे. झेब्राच्या दोन जोड्या पालिका इस्त्राईलमधून विकत घेणार आहे. त्यासाठी महापालिकेची परवानगी मिळाली आहे.
राणीच्या बागेत परदेशातून पांढरा सिंह, जिराफ, चित्ता, जॅग्वार तसेच अनेक परदेशी प्राणी आणण्यात येणार आहेत; मात्र कोविडमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राण्यांची देवाणघेवाण थांबविण्यात आली आहे. त्यामुळे या प्राण्यांचेही आगमन लांबण्याची शक्याता आहे. पालिकेने काही वर्षांपूर्वी परदेशातून पेंग्विन आणले होते; तर कोविड सुरू होण्यापूर्वी औरंगाबादमधून पट्टेधारी वाघ मुंबईत दाखल झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App