मुकेश अंबानींचे पुत्र अनंत गुजरातमध्ये उभारणार जगातील सर्वांत मोठे खासगी प्राणी संग्रहालय…


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज हा उद्योग समूह आता गुजरातमध्ये जगातील सर्वांत मोठे प्राणी संग्रहालय उभारणार आहे. जामनगर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प साकार होणार आहे. Worlds biggest Zoo will build in Gujarat by Ambani son

या प्राणीसंग्रहालयाचे नाव ‘ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन किंगडम’ असे असेल. या प्राणी संग्रहालयामध्ये आफ्रिकी सिंह, चित्ता, भारतीय लांडगा, आशियायी सिंह, पिग्मी पाणघोडा, ओरांगउटान, लेमूर, शिकार करणारी मांजर, बंगाली वाघ आदी वन्य प्राणी पाहायला मिळतील. कोमोडो ड्रॅगनसारखा दुर्मिळ प्राणी येथे असेल.या प्राणीसंग्रहालयामध्ये जगभरातील प्राणी, पक्षी आणि सरीसृप प्राण्यांच्या शंभरपेक्षाही अधिक प्रजाती पाहायला मिळतील. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

जामनगरजवळील मोती खावडी येथे कंपनीचा सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असून त्याच्याजवळच तब्बल २८० एकरवर हा प्रकल्प उभारण्यात येईल. येथे स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी एक रेस्क्यू सेंटर देखील उभारण्यात येणार आहे.

Worlds biggest Zoo will build in Gujarat by Ambani son

Worlds biggest Zoo will build in Gujarat by Ambani son

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती