पुण्यात समुद्र जीवांची तस्करी; विमानतळावर दोघांना अटक सीमाशुल्क विभागाची कारवाई , दुबईहून आणले तब्बल ४६६ प्रवाळ


दुबईहून समुद जीवांची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे विमानतळावर सीमा शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्या कडून तब्बल ४६६ प्रकारचे समुद्र प्रवाळ जप्त करण्यात आले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – दुबईहून समुद जीवांची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे विमानतळावर सीमा शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्या कडून तब्बल ४६६ प्रकारचे समुद्र प्रवाळ जप्त करण्यात आले आहे.In Dubai to pune flight specimens of live corals smuggaling two passengers arrested by custom department

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे जण मंगळवारी दुबईहुन पुण्यात आले. यावेळी विमानतळावरील ग्रीन झोन चॅनल मधून जाण्याचा प्रयत्न दोघे जण करतांना दिसले. यावेळी विमानतळावर उपस्थित सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांचा संशय आला. त्यांनी दोघांना अडवले. त्यांच्या कडे दोन बॅग होत्या.



त्यांची झडती घेतली असता. त्यात समुद्र जीव आढळले. तब्बल ४६६ प्रकारचे समुद्र प्रवाळ specimens of live corals (Order- Scleractinia with various Subfamilies) त्यांच्या बॅगेत आढळले. हे जीव वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत येतात. तसेच त्यांना घरी ठेवणे तसेच त्यांची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.

पुण्यात त्याची विक्री करण्यासाठी हे जीव दुबईहून आणल्याचे त्यांनी मान्य केले आहे. या दोघांना अटक करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्यावर वन्यजीव प्राणी सरंक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेले समुद्रजीवांचे पुनर्वसन करण्यासाठी ते मुंबई येथील तारापोरवाला मत्स्यालयात पाठवण्यात आले आहे.

In Dubai to pune flight specimens of live corals smuggaling two passengers arrested by custom department

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात