ट्रकला पाठीमागून कार धडकून चौघांचा मृत्यू


मालवाहू ट्रकला पाठीमागील बाजूने वेगात असलेल्या कारने धडक दिल्याने झालेल्या भयंकर अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – मालवाहू ट्रकला पाठीमागील बाजूने वेगात असलेल्या कारने धडक दिल्याने झालेल्या भयंकर अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ही दुर्घटना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गांवर गहुंजे येथे घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृत व्यक्तींची ओळख पटविण्याचं काम सुरू करत मयतांची ओळख पटवली आहे. Pune Mumbai express Highway near gajunje village scoda car accident four youths dead on the spot

सदर आपघातात शिवम राहुल कोकाटे ( वय -१९,रा. सदाशिव पेठ,पुणे), प्रियम सत्येंद्र राठी (२०, रा.नारायण पेठ, पुणे), ऋषिकेश मनोज शिंदे (१९, रा.बिबेवाडी,पुणे), मोहणीस संगम विश्वकर्मा (२१, रा.धनकवडी, पुणे) या चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त स्कोडा कार पुण्याहून मुंबईच्या दिशेनं निघाली होती. गहुंजे इथं क्रिकेट स्टेडियमच्या समोरच उभ्या असलेल्या ट्रकला या कारने पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक दिली. अतिशय वेगात कार चालविण्याच्या नादात वाहन चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि ती बेदरकारपणे चालवली गेली.

हा अपघात इतका भयंकर होता की पुढील भागाचा कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कारमधील चौघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती आहे. अपघाताच्या आधी कारचालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्याचे रस्त्यावरील खुणांवरून आढळून आले आहे.

Pune Mumbai express Highway near gajunje village scoda car accident four youths dead on the spot

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात