पुण्यातून एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे सार्वजनिक शौचालयात 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. याप्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडलेल्या स्थानकाजवळच सार्वजनिक शौचालय आहे. हल्लेखोराचे वय 35 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.12 year old girl sexually assaulted in a public toilet in Pune, 35 year old Naradham absconding
प्रतिनिधी
पुणे : पुण्यातून एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे सार्वजनिक शौचालयात 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. याप्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडलेल्या स्थानकाजवळच सार्वजनिक शौचालय आहे. हल्लेखोराचे वय 35 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन ते चौकादरम्यान सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहाच्या आत एक छोटीशी जागा आहे. एक 12 वर्षांची मुलगी आणि तिचे कुटुंब जवळच येथे राहतात. काल (शुक्रवार, 8 एप्रिल) दुपारी 2 वाजेच्या सुमारास पीडित महिला शौचालयात गेली असता एक व्यक्ती तिच्या मागे गेला. त्याचवेळी संधी साधून त्याने मुलीवर बलात्कार केला.
दरम्यान, पीडित मुलीचे काका तेथे आले आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. त्याचवेळी आरोपीने दरवाजा उघडून मुलीच्या काकांना बाजूला ढकलून तेथून पळ काढला. यानंतर पीडितेने रडत रडत सर्व प्रकार काकांना सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपी हा त्याच परिसरातील रहिवासी असून तो सध्या फरार आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशनचे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाजवळील घडली घटना
पुणे रेल्वे स्थानकाजवळील सार्वजनिक शौचालयात ही घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. या घटनेबाबत स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गुन्हेगारांच्या मनातून कायदा व सुव्यवस्थेची भीती नाहीशी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. फरार आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. पोलिसांनी आरोपीचे वय ३५ वर्षे सांगितले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App