हल्लाच करायचा तर “मातोश्री”वर करायचा होता!!; राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते कोणाला उकसवतायत??


प्रतिनिधी

मुंबई : शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दगडफेक आणि चप्पल फेक केली. त्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अजब वक्तव्य केले आहे. एसटी कर्मचा-यांचे आंदोलन हा राज्याचा प्रश्न होता. तुम्हाला मोर्चा काढायचा होता तर “मातोश्री”वर काढायचा होता… मग समजली असती हल्ल्याची किंमत!!, असे वक्तव्य मोहिते यांनी केले आहे.If only to attack “Matoshri” !!; Whom is NCP MLA Dilip Mohite provoking?

काही लोकांचा विशिष्ट हेतू

राज्याचे परिवहन खाते शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे आहेत मग तुम्हाला जे काय करायचे ते ज्याच्याकडे खाते आहे, तिकडे करायचे होते. ज्या विषयाशी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा संबंध नाही, जो विषय पवार साहेब हाताळत नाहीत, त्यासाठी जाणीवपूर्वक हल्ला घडवून आणण्यामागे काही लोकांचा विशिष्ट हेतू आहे, अशी टीका मोहिते पाटील यांनी केली आहे.



 

 

 वळसे – मोहिते संबंधांचा अँगल

पण मोहिते यांनी हे अजब वक्तव्य करून नेमका कोणावर निशाणा साधला आहे? हा प्रश्न तयार होत आहे. मोहिते ज्या पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार आहेत त्यांच्याच शेजारच्या आंबेगाव मतदारसंघातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील निवडून येत असतात. मग मोहित्यांच्या वक्तव्याला स्थानिक राजकारणाचा काही अँगल आहे का?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचबरोबर “मातोश्री”वर हल्ला करण्यासाठी ते कोणाला उकसवत आहेत का?, असाही सवाल या निमित्ताने तयार होत आहे.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केले. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना, त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचा-यांनी  थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश घेतला आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली.

काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचे समोर आले. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेक नेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यानंतर पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून, त्याचा तपास सुरू केला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

If only to attack “Matoshri” !!; Whom is NCP MLA Dilip Mohite provoking?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात