सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण पाेलीसांची गुप्तचर यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येते – अजित पवार


ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मुंबईतील सिल्वहर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला झाला. यावेळी पाेलीसांची गुप्तचर यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येत आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मुंबईतील सिल्वहर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला झाला. यावेळी पाेलीसांची गुप्तचर यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येत आहे. आदाेलनकर्ते ज्यावेळी त्याठिकाणी आले तेव्हा प्रसारमाध्यमाचे लाेक त्याजागी आले. मिडिया बराेबर माहिती घेते हे मिडियाने शाेधून काढले तर ते पाेलीस यंत्रणेला का शाेधून काढता आले नाही याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याला चाैकशी करण्यास सांगितले असून त्यातून वस्तुस्थिती पुढे येईल असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले आहे. Silver Oak attack case Mumbai police intelligence failure says deputy chief minister Ajit Pawar

पवार म्हणाले, महाराष्ट्रात अशाप्रकारे कधी प्रकार यापूर्वी घडलेले नाही. शरद पवार मागील ५० वर्ष राजकारणात काम करत असून अनेक एसटीच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले आहे. सातव्या वेतन आयाेगा पर्यंत वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे. आजूबाजूच्या राज्यांचे प्रमाणे वेतन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.



 

चर्चा करण्याची आमची तयारी हाेती परंतु टाेकचे वागण्याची पध्दत याेग्य नव्हती. पाेलीस विभाग त्यांचे चाैकशीचे काम करतील. त्यांचा अहवाल आल्याशिवाय मी काेणावरही आराेप करणार नाही. सदर लाेकांना भडकविण्यासाठी काेणी चिथवाणीखाेर भाषा वापरली, काेणी त्यांचे भावना भडकाऊन दिल्या, नकाे त्या गाेेष्टी त्यांच्या डाेक्यात घातल्या यामागे काेणतरी शक्ती हाेती.

ते शाेधून काढण्याचे काम पाेलीसांनी सुरु केले आहे. गृहमंत्री वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात नेमके एसटी कर्मचाऱ्यांना काेणी भडकवले याबाबत सखाेल तपास करण्याचे आदेश दिले आहे. दाेन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एसटी कर्मचारी आदाेलन ठिकाणी गुलाल उधळण्यात आला, मिठाई वाटली गेली खूप माेठे यश ज्यांनी आदाेलन केले त्यांनी मिळवले असे दाखवले गेले.

इतके सर्व झाले असताना सिलव्हर ओक या निवासस्थानी जाण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामागील नेमका मतितार्थ काय आहे? एसटी कर्मचाऱ्यांच्याशी वेळाेवेळी सरकारने चर्चा केली परंतु काहीजण आदाेलनात शिरुन त्यांनी चिथावणीची भाषा वापरली. काेराेना काळात एसटी वाहतूक ठप्प असतानाही राज्यसरकारने दर महिन्याला २५० ते ३०० काेटी रुपये पगारास दिले आहे. पाेलीस यंत्रणा यामागील मास्टरमाइंडची माहिती काढून सर्वांसमाेर लवकरच ठेवतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

Silver Oak attack case Mumbai police intelligence failure says deputy chief minister Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात