‘हॅलो ,मी शरद पवार बोलतोय’ आवाज शरद पवारांचा ,नंबर सिल्व्हर ओक’चा आणि फोनवर बोलतोय भलताच भामटा! गुन्हा दाखल


शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढत एका व्यक्तीने मंत्रालयात फोन केल्याने सगळेच चक्रावून गेले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत बोलून संबंधित व्यक्तीने फोन ठेवून दिला. मात्र, त्यानंतर खरंच हा फोन शरद पवार यांनी केला होता का, याची पडताळणी करण्यात आली. ‘Hello, I talked to Sharad Pawar’ Voice Sharad Pawar’s, Number Silver Oak and Talks on the phone! Forted offense


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय’, असा शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढत एका व्यक्तीने मंत्रालयात फोन केल्याने सगळेच चक्रावून गेले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत बोलून संबंधित व्यक्तीने फोन ठेवून दिला. मात्र, त्यानंतर खरंच हा फोन शरद पवार यांनी केला होता का, याची पडताळणी करण्यात आली आणि त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतापराव खंडेबऱ्हाड नावाच्या एका व्यक्तीला पैशांची मागणी करणारा फोन आला. समोरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच आवाज येत होता. फोन नंबर देखील शरद पवार यांच्या मुंबईतील घरचाच होता. त्यामुळे भांबावून गेलेल्या प्रतापराव खंडेबऱ्हाड यांची पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी जेव्हा घटनेचा मागोवा घेतला, तेव्हा कुठे खरा प्रकार समोर आला.

शरद पवार यांच्या आवाजाचा वापर करून फोन करण्यात आला. प्रतापराव वामन खंडेभारड यांच्याकडे संबंधित व्यवहारामध्ये अडकलेले पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या चाकणमध्ये घडलाय. या प्रकरणी प्रताप खांडेभारड यांनी चाकण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. धीरज धनाजी पठारे असं मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार गुरव याने शरद पवार यांचा आवाज काढून खांडेभराड यांना पैशाची मागणी केली होती. त्यांना किरण काकडे याची ही साथ मिळाली होती.



प्रताप खांडेभारड यांनी 2014 ला धीरज पठारे यांच्याकडून 1 कोटी 20 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या साठी खांडेभराड यांनी पठारे यांना 13 एकर जमीन ही दिली होतो. मात्र चक्रवाढ व्याज लावल्याने रक्कम वाढतच होती. त्यातच जमिनीचा व्यवहार होत नाही असे कारण सांगून पठारेने पुन्हा जानेवारी पासून पैशांची मागणी केली.

पैसे देत नाही म्हणून पठारे याने साथीदारांच्या मदतीने संगणक आणि इंटरनेटचा वापर करत थेट शरद पवार यांच्या घरचा नंबर इंटरनेट फोनसाठी वापरला आणि खांडेभराड यांच्याकडे पैशांची मागणी केली. इंटरनेटचा वापर झाल्याने मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केलीय. त्यांना 20 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबई नंतर खांडेभराड हे चाकणमध्ये राहत असल्याने आरोपी विरोधात चाकणमध्येही गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई पोलिसांच्या तपासानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आरोपींची चौकशी करणार आहेत.

दरम्यान, असाच एक प्रकार मुंबईत मंत्रालयात देखील घडल्याचं उघड झालं आहे. एका व्यक्तीने शरद पवारांच्या नावाने फोन करून थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी फोन केला. हा फोन देखील शरद पवारांच्या आवाजातच करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणावरून राज्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात फोन करणं हे अत्यंत निंदनीय आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. हा प्रकार राज्याच्या हितासाठी योग्य नसून असे काही घडल्यास राज्य सरकारला भविष्यात अनेक गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागेल”, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

‘Hello, I talked to Sharad Pawar’ Voice Sharad Pawar’s, Number Silver Oak and Talks on the phone! Forted offense

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात