मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ला, पाश्चात्य गुप्तचर संस्थांकडून इशारा मिळूनही मनमोहन सिंग सरकारने दखल घेतली नाही, द स्पाय स्टोरीज पुस्तकात गौप्यस्फोट


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्याचा इशारा अमेरिकेसह पाश्चात्य देशांतील गुप्तचर संस्थांनी भारताला दिला होता. मात्र, मनमोहन सिंग सरकारने त्याकडे दूर्लक्ष केले. कोणतीही कारवाई केली नाही असा गौप्यस्फोट नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘ द स्पाय स्टोरीज- इनसाईड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ रॉ अ‍ॅँड आयएसआय’ या पुस्तकात करण्यात आला आहे. शिवराज पाटील हे त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री होते. हल्यानंतर चारच दिवसांत त्यांच्याकडील गृहमंत्रीपद काढून घेऊन पी. चिदंबरम यांच्याकडे देण्यात आले होते.26/11 Mumbai terror attacks: Manmohan Singh government ignores warnings from Western intelligence agencies

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. ३०० हून अधिक जखमी झाले होते. कॅथी स्कॉट क्लार्क व अँड्रीयन लेव्ही या पत्रकारांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटले आहे दहशतवादी हल्यांचा इशारा पाश्चिमात्य गुप्तहर संस्थांनी दिला होता. विशेष म्हणजे त्यांना याबाबतची माहिती हल्याचा मास्टरमाइंड डेव्डि हेडली याच्याकडून मिळाली होती. दहशतवाद्यांची संभाव्य लक्ष्ये काय असतील हे देखील भारतीय गुप्तचर संस्थांना कळविण्यात आले होते. मात्र, त्याकडे पूर्णपणे दूर्लक्ष केले. त्यामुळे भारताच्या अभिमानावरच प्रहार करणारा हा हल्ला घडला.यापूर्वीही याच पत्रकारांनी लिहिलेल्या ‘द सीज- ६८ अवर्स इनसाइट ताज हॉटेल’ या पुस्तकातम्हटले आहे की, एकाचवेळी अनेक ठिकाणी हल्ले होणार असल्याच्या किमान ११ गुप्तचर सूचना मिळाल्या होत्या. त्यातील सहा सूचना या सागरी मागार्ने भारतात प्रथमच हल्ला होणार आहे, असे स्पष्ट करणाऱ्या होत्या. २००७ पासूनच लष्कर ए तय्यबा अशा प्रकारे कारवाया करीत असल्याची माहिती युरोपियन गुप्तचर संस्थांकडून मिळाली होती.

२००६ मध्ये मुंबई हल्ल्याबाबत पहिला गुप्तचर इशारा मिळाला होता त्यावेळी लष्कर ए तय्यबा व आयएसआय या दोन संघटनांनी डेव्हीड हेडली याला संबंधित अतिरेक्यांना मुंबईत जाऊन लक्ष्य ठरवण्यास सांगितले होते. त्यामुळे मुंबई हल्ल्याची तयारी २००६ मध्ये सुरू झाली होती हे समजले होते. ट्रायडंट-ओबेरॉय व ताज अशा पंचतारांकित हॉटेल्सची निवड हल्ल्यांसाठी करण्यात आली होती.

त्यानंतर किमान २५ धोक्याचे इशारे अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने भारत सरकारच्या गुप्तचर संस्थेला (रॉ-रीसर्च अँड अ‍ॅनलिसीस विंग) दिले होते. रॉ या संस्थेने ही माहिती अंतर्गत गुप्तचर संस्थेलाही दिली होती. मुंबई पोलिसांनी या माहितीची तपासणी केली. पण अमेरिकाच काहीतरी शोधतेय असे वाटल्याने मुंबई पोलीसांनी त्याकडे लक्ष दिले नाही.

संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्वाच्या मुद्यावर दूर्लक्ष झाले. शिवराज पाटील हे त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री होते. मात्र, त्यांनीही पाश्चात्य गुप्तचर संस्थांच्या इशाऱ्याकडे काही लक्ष दिले नाही. त्यामुळे मुंबई हल्यानंतर चारच दिवसांनी शिवराज पाटील यांची गृहमंत्रीपदावरून गच्छंती झाली होती. पी. चिदंबरम यांच्याकडे गृहमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आली होती.

26/11 Mumbai terror attacks: Manmohan Singh government ignores warnings from Western intelligence agencies

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण