गुणरत्न सदावर्तेंसाठी सरकारने मागितली 14 दिवसांची पोलीस कोठडी; किल्ला कोर्टाने दिली 2 दिवसांची पोलिस कोठडी!!


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर दगड आणि चप्पल फेक झाल्यावर एसटी कर्मचा-यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा या हल्ल्याच्या कटामागे हात असल्याचा आरोप करत पोलिसांनी सदावर्ते यांना शुक्रवारी रात्री अटक केली. त्यानंतर शनिवारी सदावर्ते यांना किल्ला न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यावेळी सरकार तर्फे सदावर्ते यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी कोर्टात करण्यात आली. परंतु किल्ला कोर्टाने सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी देण्याचा निर्णय दिला आहे, तर इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.+++demands 14 days police custody for Gunaratna Sadavarten; Fort court gives 2 days police custody !!

11 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी

गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी करण्यासाठी सदावर्ते यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकीलांकडून किल्ला न्यायालयात करण्यात आली होती. पण आता न्यायालयाने सदावर्ते यांना 11 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.



109 जणांना न्यायालयीन कोठडी

शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या 109 आंदोलकांच्या देखील 14 दिवस कोठडीची मागणी सरकारी वकील घरत यांनी केली होती. अ‍ॅड. गायकवाड यांनी आरोपींची बाजू न्यायालयासमोर मांडली. त्यानंतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांना आता जामीनासाठी अर्ज करता येणार आहे.

किल्ला न्यायालयात सुनावणी

गुणरत्न सदावर्ते यांनी गुरुवारी आझाद मैदान येथे शरद पवार यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी हल्ला झाल्याच्या आरोपाखाली सदावर्ते यांना गांवदेवी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी सुनावणीसाठी सदावर्ते यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप घरत, तर सदावर्तेंच्या बाजूने अ‍ॅड. महेश वासवानी यांनी युक्तिवाद केला.

दोन्ही बाजूंनी न्यायालयात युक्तिवाद

घरत यांनी या प्रकरणी सदावर्ते यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तसेच सर्व आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. या हल्ल्याच्या कटात सदावर्ते यांचा हात असून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा युक्तिवाद घरत यांनी न्यायालयात केला. त्याला उत्तर देताना वासवानी यांनी या हल्ल्याचा सदावर्ते यांच्याशी संबंध नसल्याचे म्हटले आहे.

या हल्ल्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, सदावर्ते यांना अडकवण्यात येण्याचा हा डाव आहे. हल्ला झाला तेव्हा सदावर्ते हे मॅट न्यायालयात युक्तिवाद करत होते. त्यांना या हल्ल्याची माहिती पत्रकारांनी दिली, त्यामुळे या प्रकरणात ते निर्दोष असल्याचे वासवानी यांनी न्यायालयात सांगितले. तसेच वासवानी यांनी सदावर्ते यांच्या जामिनासाठी अर्ज केला होता.

सदावर्तेंवर अजमीनपात्र कलमे

गुणरत्न सदावर्ते यांना कलम 120 – बी आणि कलम 353 सह एकूण 13 गुन्ह्यांतर्गत पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या कटात सामील असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सदावर्तेंवर लावण्यात आलेली ही दोन्ही कलमे अजामीनपात्र आहेत.

Government demands 14 days police custody for Gunaratna Sadavarten; Fort court gives 2 days police custody !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात