महात्मा गांधी तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, त्यांचे पुतळे हटविल्यावर गोडसेंच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीचे वक्तव्य


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. महात्मा गांधींचा पुतळा हटवल्यानंतर त्या जागी गोडसेंच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांनी केली आहे.Mahatma Gandhi, then the Father of the Nation of Pakistan, Godse statue should be installed after removing his statues, statement of accused in Malegaon bomb blast

चतुवेर्दी म्हणाले, मोहनदास करमचंद गांधी यांचा या देशाशी काही एक संबंध नाही. गांधीजी पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत, त्यामुळं त्यांचा भारताशी कोणताही संबंध नाही. काँग्रेस 1947 पासून राजकारण करत आहे. मात्र, कोणतंही कारण नसताना गांधींचा फोटो नोटांवर छापण्यात आलाय.देशात हजारो ठिकाणी गांधींचे पुतळे बसवण्यात आले आहेत. तसंच अनेक रस्त्यांना त्यांचं नावही देण्यात आलंय, याचा निषेध करत गांधीजींचा पुतळा हटवून त्या जागी नथुराम गोडसेचे पुतळे बसवण्यात यावेत अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली आहे. हा देश गांधींचा नसून महान क्रांतिकारकांचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Mahatma Gandhi, then the Father of the Nation of Pakistan, Godse statue should be installed after removing his statues, statement of accused in Malegaon bomb blast

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण