600 कोटींची सरकारी जमीन शरद पवार अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी लाटली; गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटलांचा आरोप


प्रतिनिधी

मुंबई : शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी 600 कोटी रुपयांची सरकारी जमीन लाटली. त्या भ्रष्टाचारा विरोधात मी तक्रार दाखल केली. सीआयडीने माझे त्याबद्दल 100 पानांचे स्टेटमेंट देखील नोंदवले. याचा बदला घेण्यासाठी शरद पवार आमच्या विरुद्ध दबावतंत्राचा वापर करत आहेत. त्यांच्यामुळे आणि गृहमंत्री दिलीप वळसे वाटल्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप एसटी कर्मचाऱ्यांची वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केला आहे.Government land worth Rs 600 crore was looted by Sharad Pawar, Ajit Pawar and Supriya Sule

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गांवदेवी पोलिसांकडून शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. एसटी कर्मचा-यांनी शरद पवार यांच्या घरावरील केलेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर करण्यात आला आहे.

यानंतर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी माझ्या पतीच्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. शरद पवार यांच्यावर मी गुन्हा दाखल केल्यामुळे शरद पवार हे दबाव तंत्र वापरत असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.

आमच्या जीवाला धोका

शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात 600 करोडच्या भ्रष्टाचाराची तक्रार मी दाखल केली आहे. याचा बदला घेण्यासाठी हे शरद पवार यांचं दबाव तंत्र आहे. माझ्या पतीच्या, माझ्या व माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. पण अनिल देशमुख जसे तुरुंगात गेले तसेच शरद पवार पण जमीन लाटण्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जातील, असे सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी म्हटले आहे.

पवारांचे डर्टी पॉलिटिक्स

शरद पवार यांच्या विरोधात सुद्धा मी मलबार हिल पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. सीआयडीने गेल्या आठवड्यात माझा 100 पानांचा जबाब नोंदवला आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माझे पती दिवसभर न्यायालयात होते, त्यांना कुठलाही प्रकार माहिती नसताना पोलिसांनी त्यांना बेकायदेशीररित्या अटक केली आहे. शरद पवार हे पोलिस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा धक्कादायक आरोपही जयश्री पाटील यांनी केला आहे.

सदावर्तेंवर अजामीनपात्र कलमे

गुणरत्न सदावर्ते यांना कलम 120-बी आणि कल्म 353 अंतर्गत पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या कटात सामील असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सदावर्तेंवर लावण्यात आलेली ही दोन्ही कलमे अजामीनपात्र आहेत.

Government land worth Rs 600 crore was looted by Sharad Pawar, Ajit Pawar and Supriya Sule

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात