जे कर्म करतो, ते या जन्मीच फेडावं लागतं, उदयनराजे यांची शरद पवार यांच्यावर टीका


विशेष प्रतिनिधी

सातारा: जे कर्म करतो, ते या जन्मीच फेडावं लागतं असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या घरावर झालेल्या हिंसक आंदोलनाचं समर्थन केलं आहे. बरोबर झालंच पाहिजे, करायलाच पाहिजे, अजून दगडं मारायला पाहिजे.Udayan Raje’s criticism on Sharad Pawar

फार छोटा विचार झाला, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांना टोला लगावला आहे.उदयनराजे म्हणाले, कर्म असतं ना कर्म. जे आपण जन्म करतो. प्रत्येकजण मला लागू होतं, तुम्हाला आणि सगळ्यांना लागू होतं. यातून कोण वाचत नाही.जे आपण या जन्मी करतो, ते ह्याच जन्मी आपल्याला कुठल्याना कुठल्या पद्धतीने फेडावं लागतं. अजून काय बोलणार.संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईतील शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल केला. बराच वेळ तिथे संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे.

Udayan Raje’s criticism on Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण