शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्याचे अमिषाने चार काेटींची फसवणुक


शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक केल्यास चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून एका व्यवसायिकाची व त्यांच्या १५ ते २० मित्रांची चार काेटी २८ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे –शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक केल्यास चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून एका व्यवसायिकाची व त्यांच्या १५ ते २० मित्रांची चार काेटी २८ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी ऋषिकेश आप्पा भाेसले (रा.वनगळ, जि.सातारा) यांचेवर फसवणुकीचा गुन्हा हडपसर पाेलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.Share market trader to assure investment in share market and get more good returns but he cheated four cr rupees

याबाबत विनायक पांडुरंग बगाडे (वय-५०,रा.सांगवी,पुणे) यांनी पाेलीसांकडे आराेपी विराेधात तक्रार दिली आहे. ऋषिकेश भाेसले याची हडपसर परिसरात वैभव थियटर जवळ शेअर ट्रेडिंगचे कार्यालय आहे. त्याठिकाणी विनायक बगाडे यांची भेट झाल्यानंतर त्याने स्वत:चा आर्थिक फायदा करण्यासाठी व गैरउद्देश साध्य करण्यासाठी गाेड बाेलुन बगाडे यांचा विश्वास संपादन केला.



त्यांना शेअर मार्केट मध्ये पैसे लावण्यासाठी द्या , मी त्याबदल्यात तुम्हाला चांगला परतावा देईल असे अमिष दाखवून त्याने तक्रारदार व त्यांच्या १५ ते २० मित्रांकडून एकूण चार काेटी २८ लाख रुपयांची रक्कम गुंतवणुक करण्यास भाग पाडून नाममात्र परतावा अगर गुंतवणुक केलेले पैसे परत न करता तक्रारदार व त्यांच्या मित्रांची फसवणुक केलेली आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पाेलीस करत आहे.

Share market trader to assure investment in share market and get more good returns but he cheated four cr rupees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात